200 unit free : 200 युनिटचे काय झालं? आमदार जोरगेवार म्हणतात

200 unit free आमदार किशोर जोरगेवार यांनी वर्ष 2019 च्या निवडणुकीत चंद्रपूर विधानसभेतील जनतेला निवडून आलो तर 200 युनिट आपल्याला कसे मोफत मिळणार यासाठी प्रयत्न करणार असल्याचा प्रचार त्यांनी केला होता. निवडणूक जिंकल्यावर विरोधी पक्षाने 200 युनिट चे काय झालं याबाबत त्यांना उत्तर विचारू लागले, काय झालं 200 युनिट चे याबाबत स्वतः आमदार जोरगेवार यांनी खुलासा केला आहे.

200 unit free निवडणुकीत विरोधकांचा दारुण पराभव केल्यावर किशोर जोरगेवार यांचं नाव राज्यातील प्रत्येक पुढाऱ्यांच्या तोंडी आलं, एका अपक्ष उमेदवाराने मोदी लाटेत भाजप च्या दोनवेळा आमदार राहिलेल्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला, त्याकाळी जोरगेवार यांना हरविण्यासाठी मंत्र्यांना रस्त्यावर उतरायला लागले होते, मात्र त्यावेळी जोरगेवार यांच्या त्सुनामी मध्ये विरोधक अक्षरशः वाहून गेले होते.

महत्त्वाचे : आजपासून चंद्रपुरात 5 दिवसीय महाकाली महोत्सवाला होणार सुरुवात

निवडणुकीत विजयी झाल्यावर त्यांनी जनतेला सर्वात आधी 200 युनिट मोफत मिळावे यासाठी प्रयत्न करू अशी घोषणा केली, त्यांनी विधानसभा अधिवेशनात अनेकदा 200 युनिट चंद्रपुरातील जनतेला मोफत मिळायला हवे यासाठी आवाज बुलंद केला, आम्ही वीज उत्पादक जिल्ह्यातील रहिवासी आहो, वीज निर्मिती करताना आम्ही मोठी किंमत मोजत आहो.

औष्णिक वीज प्रकल्पाने चंद्रपुरातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, इतकं असताना सुद्धा सरकारने जोरगेवार यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. 200 unit free

महाविकास आघाडी व त्यानंतर महायुती सरकार या दोन्ही सरकारमध्ये जोरगेवार सामील होते, महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 200 नाहीतर 100 युनिट वीज मोफत देऊ असे ठरले होते मात्र कालांतराने राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने महाविकास आघाडी सरकार पायउतार झाली आणि महायुती सरकार स्थापन झाले.

महायुती सरकारच्या कार्यकाळात नागपूर अधिवेशनात 200 युनिट साठी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर ते नागपूर पर्यंत मोर्चा काढला त्यावेळी त्यांच्या मागणीवर सकारात्मक निर्णय होणार असे आश्वासन त्यांना मिळाले मग नंतर काय झालं? यावर स्वतः जोरगेवार यांनी खुलासा केला आहे. Free electricity

आमदार जोरगेवार म्हणाले की चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होत आहे, त्याकरिता 200 युनिट वीज मोफत मिळावी असे सर्व निकष आपल्या बाजूने आहे, मात्र राज्यातील 288 आमदार पैकी फक्त एकट्याने आवाज उठविला, त्यांनतर आम्ही इतर वीज उत्पादक क्षेत्रातील आमदारांना याबाबत आवाज उचलायला सांगितले त्यांनी आवाज बुलंद केला, व आमच्या मागणीला हिरवी झेंडी मिळणार होती पण त्यावेळी काही मंत्र्यांनी या पाठपुराव्याचे श्रेय अपक्ष आमदाराला मिळणार म्हणून संपूर्ण ताकदीने विरोध दर्शविला आणि आमच्या तोंडाजवळील घास हिसकविण्यात आला.

आम्हीच आता गप्प बसणार नाही आमची मागणी रास्त आहे भविष्यात आम्ही यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया जोरगेवार यांनी दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!