A big blow to Mahavikas Aghadi : बल्लारपूर विधानसभेतून संदीप गिर्हे यांची अपक्ष उमेदवारी

A big blow to Mahavikas Aghadi 27 ऑक्टोबर रोजी कांग्रेसची यादी जाहीर झाली त्यामध्ये चंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची नावे घोषित झाल्यावर महाविकास आघाडी मधील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी कांग्रेस उमेदवार संतोष रावत पुढे बंड करण्याचा निर्णय घेत 29 ऑक्टोबर ला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक : चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षाने दिले दुर्बल उमेदवार


A big blow to Mahavikas Aghadi महाविकास आघाडी साठी चंद्रपूर जिल्ह्यातून पहिला झटका मिळणार असून मागील वर्षभरापासून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संदीप गिर्हे हे कार्यरत आहे, क्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत संदीप गिर्हे यांनी पक्षाची मशाल पोहचविली. विशेष म्हणजे त्यांनी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे निवडणुकीत आव्हान निर्माण करीत विधानसभा क्षेत्रात जनतेच्या हिताचे काम केले.


जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रापैकी 1 जागा शिवसेनेला सुटायला हवी अशी मागणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे करण्यात आली होती. यासाठी पूर्व विदर्भ प्रमुख आमदार भास्कर जाधव हे स्वतः विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी बल्लारपूर येथे दाखल झाले होते:
संदीप गिर्हे यांची जनतेमधील लोकप्रियता लक्षात घेत याबाबत अहवाल त्यांनी पक्षप्रमुख ठाकरे समोर सादर केला होता. A big blow to Mahavikas Aghadi


पक्षाने गिर्हे यांना तयारीला लागा असा आदेश दिला मात्र ऐनवेळी बल्लारपूर विधानसभा कांग्रेसच्या कोट्यात गेली.
नेहमीप्रमाणे कांग्रेसने भाजप पुढे दुर्बल उमेदवार दिला, मात्र सदर बाब गिर्हे यांना खटकली आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आता बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत खरी चुरस बघायला मिळणार हे नक्की. विशेष बाब म्हणजे विदर्भातून महाविकास आघाडी मध्ये बिघाडीची सुरुवात झाली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!