All indian Republican party : अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी स्वबळावर लढणार विधानसभा निवडणूक

All indian Republican party अ.भा. रिपब्लिकन पक्ष विधानसभा स्वबळावर लढणार, पत्रपरिषदेत पक्षाध्यक्ष प्रविण खोब्रागडे यांची माहिती

All indian Republican party चंद्रपूर – लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत संविधान आणि आरक्षणाच्या रक्षणाकरिता एकत्रित येत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने महाविकास आघाडी सोबत कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता. कांग्रेस तर्फे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सन्मानजनक वाटा मिळणार असा शब्द दिला होता. पण तो शब्द कांग्रेस कडून पाळण्यात आला नसल्याने 25 ते 30 जागा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढणार असल्याची माहीती पक्षाध्यक्ष प्रविण खोब्रागडे यांनी पत्रपरीषदेत दिली.

बल्लारपूर विधानसभा : डॉ.अभिलाषा गावतुरे निवडणुकीत मुनगंटीवार यांना देणार आव्हान


सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोर पकडू लागले आहे. कांग्रेस सोबत झालेल्या वाटाघाटीत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन सन्मानजनक वाटा दिल्या जाणार असे शब्द दिले असतांना सुद्धा तसा शब्द पाडण्यात आला नसून हक्काच्या आणि निवडून येणा_या जागा सुद्धा रिपब्लिकन पक्षासाठी सोडल्या नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्या मनात संताप व्यक्त करण्यात येत असून आता आम्ही सर्व अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आरक्षणवादी आघाडीत सोबत आहेत असेही ते म्हणाले. All indian Republican party

भाजप च्या उमेदवाराला माजी आमदारांचा विरोध


या आघाडीत खासदार चंद्रशेखर रावण, आनंदराज आंबेडकर, प्रकाश शेंडगे, वामन मेश्राम, सुरेश माने इत्यादी नेत्यांचा समावेश आहे. या आघाडीत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष पंचवीस ते तीस मतदारसंघात उमेदवार उभे करत आहे. त्याच अनुषंगाने संबंधीत जिल्हाध्यक्ष यांना ए.बी फॉर्म पोहोचता करून देण्यात आले आहे.

पत्रपरिषदेला पक्षाध्यक्ष प्रविण खोबरागडे, अशोक निमगडे, राजस खोबरागडे, प्रेमदास बोरकर, मृणाल कांबळे, गिता रामटेके, निर्मला नगराळे, महादेव कांबळे, सचिन पाटील, शंकर वेल्हेकर, हरिदास देवगडे, अश्विनी आवळे, प्रेरणा करमरकर, पंचफुला वेल्हेकार ,शिला कोल्हे, छाया थोरात, वैशाली साठे, ज्योती शिवणकर, दिलीप डांगे सर, यशवंत मृजमकर, प्रभूदास माऊलीकर , केशव रामटेके, माणिक जुमळे, सिध्दार्थ शेंडे, विजय करमरकर उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!