Ballarpur Assembly Constituency विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर व चिमूर विधानसभा क्षेत्रातील दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार व बंटी भांगडीया यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
Ballarpur Assembly Constituency बल्लारपूर विधानसभा यंदा चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु महाविकास आघाडीने अजूनही आपला उमेदवार जाहीर केला नसल्याने संभाव्य उमेदवार अजूनही विधानसभा क्षेत्रात भेटी देत आहे.
महत्त्वाचे : भाजपचे चंद्रपूर जिल्ह्यातील 4 उमेदवार वेटिंगवर
विधानसभा निवडणूक लढण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावल होत मात्र त्यावेळी त्यांना दोनदा पराभव स्वीकारावा लागला, वर्ष 1995 मध्ये मुनगंटीवार यांनी पहिल्यांदा चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली, मुनगंटीवार यांनी मंत्री व कांग्रेसचे नेते शाम वानखेडे यांचा पराभव केला, त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना 94 हजार 379 मते मिळाली होती तर कांग्रेसचे शाम वानखेडे यांना 29 हजार 915 मतांवर समाधान मानावे लागले. Ballarpur Assembly Constituency
वर्ष 1999 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर कांग्रेसचे उमेदवार विनय बांगडे यांनी आव्हान निर्माण केले मात्र त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना 84 हजार 688 मते मिळाली व कांग्रेसचे बांगडे यांना 54 हजार 101 मतांवर समाधान मानावे लागले होते. Sudhir mungantiwar
वर्ष 2004 मध्ये कांग्रेसचे गजानन गावंडे यांनी मुनगंटीवार यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला मात्र कांग्रेसचा प्रयत्न त्यावेळी फसला, सुधीर मुनगंटीवार यांना 94 हजार 3 मते तर कांग्रेसचे गावंडे यांना 67 हजार 102 मतांवर समाधान मानावे लागले, मुनगंटीवार यांनी विजयाची हट्रिक मारली.
वर्ष 2009 मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीकरिता राखीव झाले, त्यावेळी बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आले, सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं, 15 वर्षाच्या अनुभवाला सोबत घेत मुनगंटीवार मैदानात उतरले, त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना 86 हजार 196 मते तर कांग्रेसचे राहुल पुगलिया यांना 61 हजार 460 मते मिळाली. Ballarpur Assembly Constituency
वर्ष 2014 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांना 1 लाख 3 हजार 718 मते तर कांग्रेसचे घनश्याम मूलचंदानी यांना 60 हजार 118 मते मिळाली.
वर्ष 2019 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांचा आकडा घटला आणि त्यांना 86 हजार 2 मते तर कांग्रेसचे विश्वास झाडे यांना 52 हजार 762 मते मिळाली.
वर्ष 2024 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना 2 लाख 60 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला, कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभेतून विजय मिळविला, धानोरकर यांना प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 1 लाखांच्या वर मते मिळाली होती.
विधानसभेत 6 वेळा विजय तर लोकसभेत तीनदा पराभव स्वीकारल्यावर सुधीर मुनगंटीवार हे सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे, सध्या त्यांच्यासमोर कांग्रेस पक्षातर्फे डॉ.अभिलाषा गावतुरे व संतोष रावत किंवा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांची नावे चर्चेत आहे. Sudhir mungantiwar
कांग्रेस पक्षाला बल्लारपूर विधानसभा निवडणूक लढण्याचा मोठा अनुभव आहे, वर्ष 2014 मध्ये शिवसेनेने केशवराव कटरे यांना बल्लारपूर विधानसभेची उमेदवारी दिली होती त्यावेळी त्यांना केवळ 2 हजार 555 मते मिळाली होती.
सध्याच्या स्थितीत डॉ.अभिलाषा गावतुरे व शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गिर्हे यापैकी एक मुनगंटीवार यांच्या विरुद्ध बल्लारपूर विधानसभा निवडणूक लढवू शकतात.