Big blow to Congress चंद्रपूर जिल्ह्यात महिला कांग्रेस संघटनेला उभारी देणाऱ्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाचा व प्राथमिक सदस्याचा राजीनामा देत कांग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. आज 1 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत ठेमस्कर यांनी राजीनामा देत असल्याची माहिती दिली. सोबतच पक्षातील अंतर्गत वाद सुद्धा या निमित्ताने बाहेर आले आहे.
Big blow to Congress मागील अडीच वर्षांपासून नम्रता ठेमस्कर ह्या कांग्रेस पक्षात ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होत्या, मात्र मागील महिन्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरी येथे सकल कुणबी समाजाच्या मेळाव्यात अल्पसंख्याक समाजाला मते देऊ नका फक्त कुणबी समाजातील उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते, कांग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव जोपासतो मात्र खासदार धानोरकर यांच्या वक्तव्यानंतर जातीवाद व घराणेशाही चा नवा वाद जिल्ह्यात सुरू झाला. ठेमस्कर म्हणाल्या की आम्ही अल्पसंख्याक समाजाचे आहो तर उमेदवारी मागायची की नाही? आम्ही कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत पक्षासाठी दिवसरात्र काम केले मात्र उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केल्यावर पक्षातील नेत्यांच्या पोटात दुखणे सुरू झाले.
अवश्य वाचा : वाघापासून बचावासाठी त्याने पकडली म्हशींची शेपूट आणि झाला मृत्यू
त्या दरम्यान विधानसभा इच्छुक उमेदवारी साठी अनेकांनी अर्ज दाखल केले, नम्रता ठेमस्कर यांनी वरोरा विधानसभा क्षेत्रातून पक्षाकडून उमेदवारी मागितली, त्यांनतर त्यांनी विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क सुद्धा सुरू केला होता, मात्र त्यांच्या उमेदवारी ला पक्षांतर्गत विरोध सुरू करण्यात आला, उमेदवारी कशाला हवी? उमेदवारी परत घ्या अन्यथा तुम्हाला पदावरून काढण्यात येणार अशी धमकी त्यांना देण्यात आली. त्यांनतर ठेमस्कर यांना पक्षातील नेत्यांकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली, यावर ठेमस्कर यांनी कांग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांना तक्रार सुद्धा केली, मात्र तक्रारीचे निराकरण काही झाले नाही. Big blow to Congress
खासदार प्रतिभा धानोरकर व कांग्रेस जिल्हा अध्यक्ष व आमदार सुभाष धोटे यांच्या नम्रता ठेमस्कर यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला, त्या म्हणाल्या की वरोरा विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षातर्फे भाऊ व 10 वर्षांनी आपल्या मुलांसाठी आमदारकीची तयारी सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे घराणेशाहीला यापुढे चालना देण्याचे काम पक्षातील नेते करीत आहे तर कार्यकर्त्यांनी काय करावं? असा प्रश्न यावेळी नम्रता ठेमस्कर यांनी उपस्थित केला व सोबतच राजुरा येथे जिल्हाध्यक्ष आमदार, भाऊ नगराध्यक्ष, पुतण्या ची बल्लारपूर विधानसभेची दावेदारी पुढे आली आहे, राजुरा नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष यांचं आरक्षण महिलेच्या कोट्यात गेल तर पत्नीला तयार करण्यात आले आहे. असा अप्रत्यक्ष टोला ठेमस्कर यांनी पक्षातील नेत्यांवर लावला आहे.
खासदार धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचा 2 लाख 60 हजार मतांनी पराभव केल्यावर लोकसभा क्षेत्रात आता फक्त विशिष्ट समाजाला पुढे करण्याची प्रथा सुरू झाली आहे, मात्र खासदार धानोरकर यांचा विजय समाज नसून प्रत्येक कांग्रेस कार्यकर्त्यांचा आहे, आम्ही सुद्धा त्यांच्या विजयासाठी झटलो आहे.
अशी प्रतिक्रिया नम्रता ठेमस्कर यांनी यावेळी दिली.
महिला खासदार यांचं वर्चस्व असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात महिला पदाधिकारी यांच्यासोबत उमेदवारी मागितली म्हणून मिळणारी अपमानस्पद वागणूक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चर्चेचा विषय नक्की राहणार आहे. Big blow to Congress
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशी याबाबत सम्पर्क केला असता ते म्हणाले की सदर वाद हा पक्षांतर्गत आहे, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी भविष्यात निर्माण होणारे असे वाद आपसात मिटवावे. महिला अध्यक्षांचा मनधरणी करून वाद मिटवावा.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ठेमस्कर यांच्या आरोपावर एकच उत्तर दिलं….त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं….
विशेष म्हणजे ठेमस्कर यांच्या राजीनाम्यानंतर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष सव्वालाखे यांनी सुनंदा ढोबे यांची महिला अध्यक्षपदी नियुक्ती केली.