Bjp Kishor Jorgewar भाजप पक्ष हा संघटनात्मक बांधणीसाठी ओळखला जातो. आज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आपण मोठ्या संख्येने एकत्रित आले आहात. आपल्या चेहऱ्यावरील उत्साह बोलका आहे. सक्रिय कार्यकर्ताच पक्षाची आत्मा असून, याच एकतेने पक्षाचा विचार प्रत्येक घरात पोहोचवावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
Bjp Kishor Jorgewar आज घुग्घुस येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार केला. या प्रसंगी भाजपचे चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, तालुका अध्यक्ष नामदेव डावले, भाजप नेते अनिल डोंगरे, महिला तालुका अध्यक्ष शोभा पिदुरकर, पारस पिंपळकर विजय बलकी, विनोद खेवले, सुशांत शर्मा, विजय आगरे, राकेश पिंपळकर, अनिता भोयर, यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भाजप हा पक्ष संघटन बांधणीसाठी ओळखला जातो. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे. पक्षाचे धोरण आणि विचार घुग्घुस शहरातील प्रत्येक घरात पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. हा पक्ष म्हणजे केवळ एका विचारधारेचा प्रवास नसून समाजासाठी, आपल्या लोकांसाठी एक तळमळीचा संघर्ष आहे.
राजकीय : वडेट्टीवार यांनी लावले भाजपला खिंडार
आपल्यातील प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या समाजाचा आधार आहे आणि पक्षाची रीढ आहे. आपला उत्साह, निष्ठा, आणि समाजसेवेसाठी असलेली कटिबद्धता हीच पक्षवाढीसाठी महत्त्वाची आहे. चंद्रपूरसह घुग्घुस शहराच्या विकासासाठी आजपासून आपण निवडणुकीच्या कामाला लागून भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Bjp Kishor Jorgewar
मागील पाच वर्षांत आपण घुग्घुसच्या विकासासाठी पूर्णशक्तीनिशी प्रयत्न केले. याचे फलस्वरूप म्हणून घुग्घुस ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाले आहे. येथील विकासाला गती मिळाली आहे. लवकरच येथील उड्डाणपूल आणि ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. झालेली ही कामे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची असल्याचे यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले.
यावेळी भाजपच्या बंगाली कॅम्प मंडळ, बाबुपेठ मंडळ, सिव्हिल मंडळ, बाजार मंडळ, तुकुम मंडळ येथे बैठका पार पडल्या, आणि पूर्ण शक्तीने प्रचार कार्याला लागण्याचा संकल्प पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. या बैठकीला भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.