Powerful kishor jorgewar join bjp : आमदार जोरगेवार यांचा 10 वर्षाचा वनवास संपणार

kishor jorgewar join bjp चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार यांचा 10 वर्षाचा वनवास संपला असून ते 27 ऑक्टोबर रोजी घरवापसी करणार असून त्यांचा भाजप पक्षात प्रवेश होत आहे.

kishor jorgewar join bjp वर्ष 2014 मध्ये भाजप सोडून शिवसेना पक्षात प्रवेश केल्यावर किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढली होती, त्यावेळी त्यांना 52 हजार मत मिळाले मात्र त्यांचा पराभव झाला, वर्ष 2009 मध्ये पालकमंत्री मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवार तर हंसराज अहिर यांच्याकडून राजेश मुन यांचं नाव पक्षाकडे गेलं मात्र दोन्ही नेत्यांच्या वादात जागा सुटू नये यासाठी भाजपने नागपूर निवासी नाना श्यामकुळे यांना चंद्रपूर मध्ये पाठवीत विधानसभेची उमेदवारी दिली.

राजकीय : ब्रह्मपुरी येथे विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लावले खिंडार

त्यावेळी निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्यांना डावलून बाहेरच्या पदाधिकाऱ्याला भाजपने उमेदवारी दिली होती, नाना श्यामकुळे विजयी झाले मात्र निष्ठवंतांना डावल्ल्याची खंत अनेकांच्या मनात होती, 2014 ला जोरगेवार यांनी भाजप सोडली, विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसमोर आव्हान निर्माण केलं होतं, पराभव झाल्यावर जोरगेवार घरी बसले नाही तर त्यांनी 5 वर्षे सतत जनतेच्या संपर्कात राहिले. kishor jorgewar join bjp

वर्ष 2019 ला जोरगेवार यांनी कांग्रेस पक्षाला विधानसभेची उमेदवारी मागितली मात्र त्यावेळी खासदार बाळू धानोरकर यांचा विरोध बघता जोरगेवार यांना उमेदवारी मिळाली नाही, परंतु 2019 ला जोरगेवार अपक्ष निवडणुकीत उभे राहिले, कांग्रेस पक्षाची जमानत जप्त झाली, भाजप चा तब्बल 72 हजार मतांनी पराभव झाला.

त्यावेळी महाविकास आघाडी अस्तित्वात आली, जोरगेवार यांनी सरकारला समर्थन दिले, अडीच वर्षांनी महायुती सरकार राज्यात स्थापन झाले, अपक्ष आमदार असल्याने विधानसभा क्षेत्रातील कामे व्हावी यासाठी जोरगेवार यांनी महायुती सरकारला समर्थन दिले.

या दरम्यान पालकमंत्री मुनगंटीवार विरुद्ध आमदार जोरगेवार यांचा अनेकदा वाद झाला, अनेक सार्वजनिक कार्यक्रमात दोघेही एकमेकांवर टीकास्त्र सोडत होते, लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार जोरगेवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा दिला, मात्र मुनगंटीवार यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. kishor jorgewar join bjp

मुनगंटीवार यांच्याशी जवळीकता वाढल्याने वर्ष 2024 मध्ये आमदार जोरगेवार यांना भाजपची उमेदवारी मिळणार अशी शक्यता निर्माण झाली मात्र त्यांच्या उमेदवारीला पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विरोध दर्शविला, अश्यात आमदार जोरगेवार यांच्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे भाजप पक्षाची संजीवनी घेऊन आले, आणि जोरगेवार यांचा भाजप पक्षात प्रवेश निश्चित केला.

परंतु या राजकीय घडामोडी मध्ये पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विरोध दर्शविला कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांनी लक्षात घ्याव्या यासाठी दिल्ली ला गेले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही अखेर निष्ठवंतांच्या उमेदवारीचा इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती झाली, मात्र यंदा जोरगेवार यांना अहिरांची संजीवनी कामी आली. kishor jorgewar join bjp

भाजपच्या वरिष्ठांनी एक एक विधानसभा महत्वाची आहे हे नेत्यांना सांगितले आहे तर आपले उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून यावे यासाठी प्रयत्न करा असा आदेश दिला.

आता 10 वर्षांनी आमदार जोरगेवार यांची भाजपात घर वापसी होणार असून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार हे आमदार किशोर जोरगेवार असणार हे स्पष्ट झाले आहे, राजकारणात काहीही होऊ शकते हे याचं जिवंत उदाहरण आहे.

वर्ष 2019 च्या निवडणुकीत आमदार जोरगेवार यांना मतदारांनी भाजप विरोधात मतदान केले पण यावेळी चित्र वेगळे आहे, जनतेच्या मनात जोरगेवार अपक्ष म्हणून निवडून येणार असा कल आहे, ज्या विरुद्ध आपण निवडणूक लढलो आता त्या पक्षाला मतदान जनता करेल काय? हा मोठा गोंधळ व प्रश्न निर्माण झाला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!