mla kishor jorgewar in bjp विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना कोण टक्कर देणार असा प्रश्न सर्व राजकीय पक्षासमोर उभा झाला होता, आधी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाला जोरगेवार यांनी उमेदवारी मागितली, त्यावेळी चंद्रपूर कांग्रेस व खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जोरगेवार यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला, त्यामुळे आमदार जोरगेवार यांना राष्ट्रवादी कांग्रेसने उमेदवारी नाकारली.
अनेक राजकीय घडामोडी नंतर आमदार जोरगेवार आज भाजप पक्षात सामील झाले आणि भाजपच्या जागेचा तिढा सुटला.
Mla kishor jorgewar in bjp चंद्रपुरातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार व माजी कांग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांनी आज भाजप पक्षात प्रवेश करीत पक्षाला मजबुती देण्याचे काम केले.
यावेळी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी खासदार हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला.
महत्त्वाचे : चंद्रपुर शहरात वेश्याव्यवसाय, 4 महिलांची सुटका
विशेष म्हणजे जोरगेवार यांना भाजपचे तिकीट मिळावे यासाठी माजी खासदार हंसराज अहिर यांनी प्रयत्न केले.
वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी सर्वच राजकीय पक्षांना पराभवाची धूळ चाटवित 72 हजारांचे मताधिक्य घेतले होते, आधी भाजप प्रवेशवरून अनेक वादंग पक्षात निर्माण झाले, मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक ब्रिजभूषण पाझारे यांना तिकीट मिळावी याकरिता मुनगंटीवार हे प्रयत्नशील होते मात्र ऐनवेळी जोरगेवार यांच्या एंट्रीने पक्षात बंडाचे वातावरण निर्माण झाले, खुद्द मुनगंटीवार हे दिल्ली ला गेले, आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची भावना लक्षात घ्यावी व उमेदवारी देण्यात यावी अशी विनंती त्यांनी पक्ष श्रेष्ठीना केली होती. Mla kishor jorgewar in bjp
मात्र पक्ष श्रेष्ठीनी जोरगेवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, आणि त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम आज घेण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्याला मुनगंटीवार विरुद्ध किशोर जोरगेवार हा वाद नवा नाही मात्र यंदा जोरगेवार यांनी या वादात आघाडी घेतल्याने भाजप चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारणार हे निश्चित झाले आहे.

महिला कांग्रेसच्या माजी अध्यक्षा नम्रता ठेमस्कर यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जातीय राजकारण विरोधात कांग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता, चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात नम्रता ठेमस्कर यांची ओळख फायरब्रॅंड नेता म्हणून आहे.
आजच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार जोरगेवार व ठेमस्कर यांच्या शेकडो समर्थकांनी पक्षात प्रवेश करीत जिल्ह्यातील 6 विधानसभा जागेवर विजय निश्चित होणार अशी हमी दिली. Mla kishor jorgewar in bjp
विशेष म्हणजे आजच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपचे ब्रिजभूषण पाझारे व त्यांचे समर्थक उपस्थित नव्हते, सध्या समाजमाध्यमांवर पाझारे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असे संदेश पसरलेले आहे.
असंख्य कार्यकर्त्यांनी आम्ही जोरगेवार यांचं काम करणार नाही अशी भूमिका घेतली आहे, कार्यकर्त्यांच्या या बंडावर पालकमंत्री काय भूमिका घेणार ही येणारी वेळ सांगेलचं. Mla kishor jorgewar in bjp
वर्ष 1995 पासून भाजप पक्ष चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवीत आला मात्र त्यांच्या विजयी रथाला खिंडार लावण्याचे काम आमदार जोरगेवार यांनी केले, त्यावेळी आमदार जोरगेवार यांना जनतेनी भाजपविरोधी मतदान केले होते, 2009 मध्ये जोरगेवार यांना भाजपने तिकीट नाकारल्यावर त्यांनी पक्ष सोडला आणि विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली होती हे विशेष.