police transfer : चंद्रपूर पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या

police transfer निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या


Police transfer चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच पोलिस महासंचालकांच्या आदेशाने जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तीन पोलिस निरीक्षक, तीन सहायक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. मागील महिन्यांतसुद्धा जवळपास १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

अवश्य वाचा : आमदार जोरगेवार यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग खडतर

जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक रमाकांत दत्तात्रय कोकाटे यांची नागभीड येथे ठाणेदारपदी, नागभीडचे पोलिस निरीक्षक अमोल मारोतराव काचोरे यांची भद्रावती ठाणेदार, डायल ११२ चे पोलिस निरीक्षक प्रकाश पुरुषोत्तम राऊत यांची जिल्हा विशेष शाखा, चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे.

राजकीय : शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांना हद्दपारीची नोटीस

सहायक पोलिस निरीक्षक धर्मेंद्र महादेव मडावी यांची नक्सल सेल, एपीआय सचिन राखुंडे दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर, पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलिस उपनिरीक्षक भरत रमेश थिटे – वाचक, पोलिस अधीक्षक, पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय भिकनदास कोलते यांची शहर पोलिस स्टेशन, पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलिस उपनिरीक्षक पल्लवी मधुकर काकडे यांची चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!