Congress party news : चंद्रपुरात आजपासून कांग्रेस उमेदवारांच्या मुलाखती

Congress party news विधानसभा निवडणुकीचा बिगुल आता येत्या काही दिवसात वाजणार आहे, ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागणार असून विविध राजकीय पक्षांनी आपआपली तयारी सुरु केली आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षात अनेक उमेदवारांनी आपली दावेदारी करीत अर्ज केले आहे.

अवश्य वाचा : चंद्रपूर मनपाच्या या प्रकल्पाचे पंतप्रधान मोदी करणार उदघाटन


Congress party news आता इच्छुकांना पक्ष निरीक्षकांसमोर मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे. कांग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला व कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत कांग्रेस चंद्रपूर जिल्हा निरीक्षक म्हणून आमदार अभिजित वंजारी यांची नियुक्ती केली आहे.


1 ते 8 ऑक्टोम्बर पर्यंत इच्छुक उमेदवार यांची मुलाखत आमदार वंजारी घेणार असून त्यांनतर मुलाखतीचा गोपनीय अहवाल 10 ऑक्टोम्बर ला प्रदेश कार्यालयाकडे सादर करणार आहे.
त्यांनतर कांग्रेस उमेदवारीबाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेत उमेदवारी जाहीर करणार आहे. Chandrapur


कांग्रेस चंद्रपूर जिल्ह्यातील 6 जागांवर लढणार असे आधी खासदार धानोरकर यांनी जाहीर केले होते मात्र जिल्हातील 2 जागा मित्र पक्षाच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती आहे.
चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, वरोरा, राजुरा व चिमूर विधानसभा क्षेत्रातून अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. Chandrapur


वर्ष 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर वगळून इतर क्षेत्रात कांग्रेसचे स्थिती चांगली होती, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस चौथ्या क्रमांकावर होती हे विशेष.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!