Powerful Independent candidate : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात अस्तित्वाच्या लढाईला सुरुवात

Independent candidate गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रभर गाजत असलेल्या आणि भरपूर रस्सीखेच सुरू असलेल्या 72 बल्लारपूर मतदारसंघांमधील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले.

Independent candidate गेल्या दहा दिवसापासून 72 बल्लारपूर मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे तिकीट कुणाला मिळेल यावरून भरपूर रस्सीखेच आणि चर्चेला उधाण आलेलं होतं, मुंबईपासून दिल्लीपर्यंत या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भरपूर चर्चा सुरू होती.

उमेदवारी अर्ज : विरोधकांना हादरविणारं शक्तिप्रदर्शन

मतदारसंघांमधील शिक्षित सक्षम महिला ओबीसी उमेदवार म्हणून डॉक्टर अभिलाषा ताई गवतुरे यांचे नाव आघाडीवर होतं आणि त्यांनी गेल्या दहा-पंधरा वर्षा पासून सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं होतं आणि गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी मूल बल्लारपूर मतदारसंघांमध्ये प्रतिभाताई धानोरकर या काँग्रेस उमेदवारासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. Independent candidate

अशा परिस्थितीमध्ये जर डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान पालकमंत्री आणि राज्यातील मातब्बर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना ही निवडणूक जड जाईल अशी चर्चा जिल्हाभरामध्येच नाहीतर राज्यभरामध्ये सुरू होती आणि त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी प्रचंड प्रयत्न सुद्धा केल्या गेले.

गुन्हेगारी : चंद्रपूर शहर पोलिसांचे धडक कारवाई सत्र

राहुल गांधी यांचं संख्येच्या प्रमाणामध्ये मागासवर्गीयांना प्रतिनिधीत्व देण्याचं धोरण मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये लागू करण्याचा प्रयत्न सुरू केला होत आणि म्हणून ही उमेदवारी डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनाच मिळणार अशा कयास मतदारसंघातील मतदारांचा होता पण काँग्रेसमधील गटातटाचा राजकारणामध्ये एका सक्षम उमेदवाराचा बळी गेला आणि ती उमेदवारी डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांना न मिळता संतोष सिंग रावत यांना काँग्रेसने जाहीर केली यानंतर डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे कोणते पाऊल उचलतात याकडे सर्व मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागलं होतं.

राजकीय : 105 उमेदवारांचे अर्ज, 75 लाखांची रोकड जप्त


अभिलाषा गावतुरे यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा मतदारसंघातील जनतेची असल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला होता मात्र आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला आणि डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मुल येथील तहसील कार्यालयामध्ये अपक्ष म्हणून सादर केला.

शक्ती प्रदर्शन

गेल्या तीन दशकापासून मतदारसंघातील जनतेच्या समस्यांना कोणी सोडून राहिलेलं नाही आणि म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मतदार आम्हाला भरघोस प्रतिसाद देतील अशी अपेक्षाही डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी व्यक्त केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!