Joined the Congress Party जिल्हा बॅक उपाध्यक्ष यशवंत दिघोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश, ब्रम्हपूरीत भाजपला खिंडार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश
Joined the Congress Party राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक बांधिलकी, सर्व समाजाला न्याय देण्याहेतू सुरु असलेले अथक प्रयत्न, सामान्यांप्रती असलेली आपुलकी, सामान्य कार्यकर्त्यांची जाण व क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांचा झंजावत तसेच भोई समाजाला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत हजारोंच्या संख्येने मिळवून दिलेले घरकुले अशा विविध कार्यामुळे प्रेरित होऊन चंद्रपूर जिल्हा बँक उपाध्यक्ष यशवंत दिघोरे यांचे नेतृत्वात शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
निवडणूक : शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून भरणार उमेदवारी अर्ज
गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी तालुक्यात हजारोंच्या संख्येने असलेल्या भोई समाज बांधवांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घरकुल मिळवून दिले. तसेच सर्व समाजाप्रती त्यांची आदर भावना, ब्रम्हपूरी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विवीध विकासकामे, रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा विविध कार्यातून त्यांनी मतदारसंघातील जनतेची मने जिंकली आहे. Joined the Congress Party
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सर्वसमावेशक सामाजिक, राजकीय व विकासात्मक दूरदृष्टीकोण तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची जाण असणारा नेता म्हणून या सामाजिक भावनांनी प्रेरित होवून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
आयोजित प्रवेशाप्रसंगी मार्गदर्शन पर बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी सामन्यातून आलो असल्याने मला सामान्य कार्यकर्त्यांची जाण आहे. मला प्रत्येक समाजाला समान न्याय देणे, त्यांचा हक्क मिळवून देण्याची शक्ती ही तुमच्या कडूनच मिळाली आहे. तुमच्या विश्वासाला मी तडा जावू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. Joined the Congress Party
ब्रम्हपूरी तालुक्यातील निलज, चौगान, मेंडकी, तुलानमाल, चोरटी, हळदा, कोसंबी, तुलानमेंढा, तुलानमाल, भुज, वांद्रा, आवळगाव, पद्मापुर, मुडझा, चौगान, जुगनाळा, कळमगाव, गोगाव, सायगाव, मुडझा, बोदरा, सिंदेवाही तालुक्यातील आलेसुर, पेंढरी कोके, मिनघरी येथील कार्यकर्त्यांचा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दुपट्टा टाकून काँग्रेस पक्षात प्रवेश स्वीकारत स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलींद भन्नारे यांनी केले.
आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नेते डॉ. देविदास जगनाडे, जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलींद भन्नारे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, राजीव गांधी पंचायतराज संघटनचे प्रदेश सरचिटणीस डॉ.थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, माजी नगरसेवक संजय ठाकुर, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, विमुक्त जाती व भटक्या जमाती सेलचे देवचंद ठाकरे, सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर गणवीर व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. Joined the Congress Party
ब्रम्हपुरी शहरातील माजी नगरसेवकासह नागरिकांनी केला काॅंग्रेस पक्षप्रवेश
ब्रम्हपूरी शहरातील माजी नगरसेवक चक्रेश करंबे यांसह अंकुश रामटेके, वैभव हुमने, मनीष गेडाम, संकेत हुमने, अभय दोनाडकर, संदीप कांबळे, साजन पिल्लेवान यांनी सुध्दा यावेळी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.