Exclusive Kishor Jorgewar Bjp Candidate : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात महायुतीचे मेरिट उमेदवार किशोर जोरगेवार?

Kishor Jorgewar Bjp Candidate विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये आता हळूहळू चुरस निर्माण होत आहे, महाविकास आघाडी व महायुती ने काही उमेदवारांची यादी जाहीर केली तर काही जागांवर एकमत नसल्याने जागा वाटपाचे घोड अजूनही अडलं आहे.

Kishor Jorgewar Bjp Candidate चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी आधी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली मात्र कांग्रेसने जोरगेवार यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला त्यामुळे त्यांचा प्रवेशाचा मार्ग खडतर झाला.

24 ऑक्टोबर रोजी रात्री दिल्ली मध्ये खलबत झालं आणि जोरगेवार हे भाजपचे उमेदवार असणार अशी माहिती बाहेर आली, त्यामुळे भाजप निष्ठावंत खवळून गेले, आता भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे, यासाठी भाजपचे पदाधिकारी नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपली भूमिका मांडणार आहे.

जोरगेवार यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार तातडीने दिल्ली ला रवाना झाले, आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका काय? हे समजवून सांगण्यासाठी मुनगंटीवार दिल्ली येथे जात असल्याची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे. Kishor Jorgewar Bjp Candidate

महत्त्वाचे : चंद्रपूर पोलीस म्हणतात या पोलिसांपासून सावध रहा

विशेष बाब म्हणजे यंदा महायुती मेरिट नुसार तिकीट वाटप करणार आहे, महायुती च्या सर्व्हेमध्ये किशोर जोरगेवार हे आघाडीवर असल्याने भाजप पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचे कदाचित ठरविले असणार अशी शक्यता आहे.

वर्ष 2019 मध्ये आमदार जोरगेवार यांच्या उमेदवारीला कांग्रेस पक्षातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी विरोध दर्शविला होता, आता वर्ष 2024 मध्ये पुन्हा कांग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जोरगेवार यांच्या महाविकास आघाडी मधून उमेदवारीला विरोध केला.

विशेष म्हणजे धानोरकर यांच्या विरोधामुळे किशोर जोरगेवार यांनी 72 हजार मतांची आघाडी घेत राष्ट्रीय पक्षांना धोबीपछाड दिली होती, मात्र त्यावेळी महाविकास आघाडी ने एका जागेचे नुकसान केले होते, आता सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. Kishor Jorgewar Bjp Candidate

सत्तेसाठी सर्व पक्षांना एक-एक जागा महत्वाची आहे मात्र महाविकास आघाडी व महायुती आमदार जोरगेवार यांच्या उमेदवारीला विरोध करीत स्वतःच नुकसान करीत आहे.

चंद्रपूर विधानसभा ही जागा कांग्रेस पक्ष 1995 पासून सतत हरत आहे, वर्ष 2014 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर तर वर्ष 2019 मध्ये कांग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर होता त्यानंतर सुद्धा कांग्रेस पक्षाचा चंद्रपूर विधानसभेवरील दावा हास्यास्पद आहे असे जाणकारांचे मत आहे. लोकसभा निवडणुक व विधानसभा निवडणूक यामध्ये मोठा फरक असतो.

एकेकाळी आमदार मुनगंटीवार यांचे भाजप पक्षातील खंदे समर्थक म्हणून किशोर जोरगेवार यांची ओळख होती, मात्र राजकारणात वैर व मैत्री हे जास्त काळ टिकत नसते.

सध्या महाविकास आघाडी व महायुती मधील नेते आपापल्या सोयीनुसार उमेदवारी ठरवीत सेटिंग चे राजकारण करीत आहे. जोरगेवार यांनी अपक्ष निवडणूक लढल्यास तेचं जिंकणार असा कौल चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील मतदारांचा आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!