Maharashtra Assembly Elections 2024 : वाहन चालक मालक संघटना ब्रह्मपुरी विधानसभा निवडणूक लढविणार

Maharashtra Assembly Elections 2024 22 ऑक्टोबर पासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विविध राजकीय पक्षातील इच्छुक व अपक्ष उमेदवार आजपासून अर्जप्रक्रियेला प्रारंभ करतील.

महत्त्वाचे : राजुरा विधानसभा क्षेत्रात यंदा परिवर्तनाचे वारे

Maharashtra Assembly Elections 2024 अश्यातच राज्यातील जय संघर्ष संस्था प्रणित वाहन चालक मालक संघटना यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात उमेदवार घोषित केला आहे.

जय संघर्ष संस्था प्रणित संघर्ष वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य मागील दहा वर्षापासून राज्यातील वाहन चालक आणि मालक यांच्या समस्या घेऊन मागण्यांची पूर्तता करण्यासाठी मोर्चे, आंदोलने, करून शासन दरबारी मागण्या मागत आहेत. मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही.

राजकीय : सुधीर मुनगंटीवार सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

अखेर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात संघटनेच्या वतीने १५ उमेदवार उभे करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सुधीर महादेव टोंगे यांना संघटनेकडून उमेदवारी दिली असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोद चांदेकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

पत्रकार परिषदेतून केली उमेदवारीची घोषणा


जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना संस्थापक अध्यक्ष संजय माणिकराव हाळनोर यांचे नेतृत्वात मागील अनेक वर्षापासून सदर संघटना काम करीत असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात संघटनेचे १५ हजार सदस्य कार्यरत आहेत. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सुधीरभाऊ टोंगे या ओबीसी प्रवर्गातील कार्यकर्त्याला जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना कडून उमेदवारी घोषित केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!