Congress candidate list : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी

Congress candidate list बलाढ्य उमेदवारासमोर कांग्रेस पक्षाने पुन्हा एकदा कमजोर उमेदवार देत विधानसभा निवडणुकीत आधीच आपला पराभव मानला अशी चिन्हे कांग्रेसची यादी जाहीर झाल्यावर पुढे आली आहे.

Congress candidate list चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून कांग्रेसचे प्रवीण पडवेकर, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून संतोष रावत तर वरोरा विधानसभा क्षेत्रातून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा पानिपत : देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीला विरोध

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रामात उतरलेले भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सिडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष तथा कांग्रेस नेते संतोषसिंह रावत यांना उमेदवारी देण्यात आली आहे, संतोषसिंह रावत यांचा जनसंपर्क केवळ मूल व काही प्रमाणात पोम्भूर्णा इथपर्यंत आहे, त्यामुळे मुनगंटीवार यांच्यापुढे त्यांचं आव्हान संपुष्टात येईल हे नक्की. कांग्रेसच्या अभिलाषा गावतुरे ह्या मुनगंटीवार यांना चांगल्या प्रकारे निवडणुकीत आव्हान निर्माण करू शकल्या असत्या. Congress candidate list

चंद्रपूर मनपाची निवडणूक हरलेले माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर यांचा जनसंपर्क विधानसभा क्षेत्रात अत्यंत कमी आहे, ते आजपर्यंत पूर्ण विधानसभा क्षेत्र पिंजून काढू शकलेले नाही, त्यामुळे कांग्रेस चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत सहजतेने पराभूत होणार हे अटळ आहे.

वरोरा विधानसभा क्षेत्रात खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यांचा कांग्रेस पक्षाशी काही एक संबंध नाही, ते साधे पदाधिकारी सुद्धा नाही त्यांची ओळख ही खासदार यांचे बंधू म्हणून आहे. वरोरा विधानसभा क्षेत्रात डॉ.चेतन खुटेमाटे किंवा अनिल धानोरकर यांना उमेदवारी दिली असती तर वरोरा कांग्रेसला पुन्हा काबीज करता आले असते. Congress candidate list

मागील अनेक वर्षांपासून विधानसभा निवडणुकीत साट्या लोट्याचे राजकारण सुरू आहे, नेत्यांसोबतचे हितसंबंध जोपासत त्यांच्यापुढे कमी ताकदीचा उमेदवार देण्याची प्रथा कांग्रेस पक्षाने सुरू केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर येथे दिवंगत खासदार धानोरकर यांनी सभा घेतली नव्हती तर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी वरोरा विधानसभा क्षेत्रात सभा घेतली नव्हती.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात बाहेरून आलेले सुधाकर अंभोरे, राजू झोडे यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले होते, मात्र ते कांग्रेसच्या राजकारणाला समजू शकले नाही आणि स्वतःची राजकीय आत्महत्या करून बसले. आता त्यांनी थाटामाटात सुरू केलेले कार्यालय बंद करण्याची नामुष्की झोडे आणि अंभोरे यांच्यावर ओढावली आहे.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मुनगंटीवार यांना आव्हान देण्यासाठी डॉ.अभिलाषा गावतुरे व ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी जनसंपर्क सुरू करीत विधानसभा क्षेत्र पिंजून काढले मात्र लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला मिळालेले यश आणि अति आत्मविश्वास मुळे त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील 6 जागेवर दावा केला. विशेष बाब म्हणजे घटक पक्षाला एकही जागा कांग्रेसने सोडली नाही.

आता या विधानसभा निवडणुकीच्या पानिपत मध्ये महाविकास आघाडी मधील पक्ष एकमेकांना साहाय्य करतात की मुकदर्शकाची भूमिका बजावतात हे निवडणूक काळात बघायला मिळेल.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!