Babupeth railway flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल

Babupeth railway flyover 50 वर्षांपासून बाबूपेठ येथील नागरिक उड्डाणपुलाची मागणी करीत होते, मात्र उड्डाणपुलाच्या निर्माणात अनेक अडचणी आल्या मात्र पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बाबूपेठ वासीयांचे स्वप्न साकार झाले.

Babupeth railway flyover आज 15 ऑक्टोबर या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपुरात लाखो नागरिकांना धम्म दीक्षा दिली आणि यादिवशी बाबूपेठ उड्डाणपूलाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आले याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महत्त्वाचे : टिल्लू पंप लावणार तर मनपा टाकणार काळ्या यादीत


बाबूपेठ उड्डाणपूलाचा नामकरण सोहळा आज पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला, यावेळी मुनगंटीवार म्हणाले की मी अर्थमंत्री असताना या उड्डाणपूल बाबत मी दखल घेत केंद्र सरकारतर्फे मंजुरी मिळवून दिली, आणि बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे काम सुरू झाले मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर निधी थांबला आणि काम पुन्हा थांबले नंतर महायुतीचे सरकार आल्यावर उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाली आणि आज हा उड्डाणपूल तयार झाला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल


आजचा शुभ दिवस व नागरिकांची मागणी नुसार उड्डाणपुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात आलं.
आयोजित नामकरण कार्यक्रमाला बाबूपेठ वासीयांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!