new cyber frauds : चंद्रपूर पोलीस म्हणतात या पोलिसांपासून सावध रहा

new cyber frauds देशात आज नवनवीन फसवे प्रकरण समोर येत आहे, देश तंत्रज्ञानात पुढे जात आहे त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाचा वापर नवनवीन गुन्ह्यासाठी होत आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत नामवंत व्यक्तींची फसवणूक झाली हे विशेष.

महत्त्वाचे : वरोरा विधानसभा क्षेत्रात खासदार धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

New cyber frauds हॅलो मी पोलीस बोलत आहो, आपल्या मुलाला गंभीर गुन्ह्यात आम्ही अटक केली असून त्याला सोडवायचं असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील अश्या प्रकारचे व्हाट्सएप कॉल अनेक नागरिकांना येत आहे, काही या कॉल ला बळी पडतात तर काही सजग असतात.

विशेष म्हणजे कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या डीपीवर पोलिसांचा फोटो असतो, चंद्रपुरातील काही सराफा व्यापाऱ्यांना त्यांच्या खाजगी मोबाईल क्रमांकावर पोलीस डीपी असणारे व्हाट्सएप कॉल येत असून पुढचा व्यक्ती धमकी देत अटकेती भीती दाखवीत आहे. New cyber frauds

यावर आज चंद्रपूर पोलिसांनी सराफा व्यापारी व नागरिकांना आवाहन केले की इतर राज्यातील पोलीस हे स्थानिक पोलिसांच्या मदतीशिवाय कुणालाही अटक करू शकत नाही, सीबीआय, पोलीस व ईडी अधिकारी म्हणून कुणी कॉल करीत असेल किंवा व्हिडीओ कॉल करण्यास आग्रह करीत असेल तर अश्या कॉल पासून सावध रहावे कारण हा एक नवीन सायबर फसवणुकीचा प्रकार असून त्याला बळी पडू नका.

आपल्याला कुणी अश्याप्रकारे धमकी, पैश्याची मागणी किंवा ब्लॅकमेल करीत असेल तर तात्काळ HTTPS://cybercrime.gov.in या संकेत स्थळावर रिपोर्ट and check suspect करावी किंवा 1930 वर कॉल करून सायबर गुन्ह्यांची तक्रार करावी.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!