Exclusive Nomination application filed : 7 उमेदवारी अर्ज दाखल, वरोरा विधानसभा क्षेत्रात लाडक्या भावाचा अर्ज

Nomination application filed महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या तिस-या दिवशी आज (दि. 24) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण सात उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.

महत्त्वाचे : बल्लारपूर शहरात आरोग्य विमा घोटाळा

Nomination application filed यात 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) आणि वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सुरेश मल्लारी पाईकराव (अपक्ष), 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात निरंक, 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात विजय नामदेवराव वडेट्टीवार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात किर्तीकुमार भांगडीया (भारतीय जनता पार्टी) आणि सतिश वारजुकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांनी गुरुवारी नामांकन अर्ज दाखल केले.

तर आज 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 19 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 14 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 14 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 34 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 20 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 20 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 121 अर्जांची उचल करण्यात आली आहे.

वरोरा विधानसभा क्षेत्रात निष्ठावंत कांग्रेस कार्यकर्त्यांना डावलून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!