Umed : उमेद कर्मचारी झाले ना उमेद

umed ‘उमेद’ च्या कर्मचाऱ्यांनाच नाउमेद होण्याची वेळ येत असेल तर हा शासनाचा सपशेल पराभव – डॉ. अभिलाषाताई गावतुरे


Umed राज्यातील ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी उमेद या योजनेची निर्मिती करण्यात आली व त्यांची अंमलबजावली करण्याची जबाबदारी उमेदच्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली. शासनाची ही योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम गेल्या बारा वर्षापासून उमेदचे महिला कॅडर, कंत्राटी अधिकारी व कर्मचारी अविरतपणे करीत आहेत.

अवश्य वाचा : चंद्रपूर महिला कांग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांचा राजीनामा, कांग्रेस नेत्यांवर केले गंभीर आरोप

शासनाच्या योजनांची यशस्वीपने अंमलबजावणी करण्याची धुरा याच कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे.परंतु नियमित आस्थापना नसल्यामुळे उमेदच्या कर्मचाऱ्यांनाच नाउमेद होऊन उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल तर हा शासनाचा पराभव आहे.

कांग्रेस अध्यक्षांचा राजीनामा


एकीकडे जंगलासाठी ,जंगली जनावरांसाठी स्वतंत्र वनविभाग असून त्याच्यामध्ये कायमस्वरूपी आस्थापना आहे पण परंतु गरिबीचे निर्मूलन करण्याच्या उद्देश्याने असलेली एवढी मोठी योजना माणसांच्या विकासासाठी असून त्यात राबणाऱ्या कर्मचाऱ्यांची मात्र विस्थापना होने ही फार मोठी शोकांतिका आहे.


उमेद महिला व कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यासाठी
उमेद महाराष्ट्र राज्य महिला व यांनी शासन विरोधात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन उभारले आहे. या धरणे व असहकार आंदोलनाची सुरुवात 26 सप्टेंबर पासून करण्याचे आली आहे.

उमेद कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला भूमिपुत्र ब्रिगेड व कांग्रेस नेत्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी भेट देत त्यांच्या आंदोलनाला आपले समर्थन दिले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!