Prostitution विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये स्थानिक गुन्हे शाखा अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित असून 26 ऑक्टोबर ला स्थानिक गुन्हे शाखेने राहत्या घरी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेला अटक करीत इतर 4 महिलांची सुटका केली.
Prostitution आदर्श आचारसंहिता काळात पोलीस विभागाचे अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेवर अवैध धंद्यावर कारवाई करण्याची जबाबदारी दिली असून पोलीस अधीक्षकांच्या आदेशावर गुन्हे शाखा कारवाई सत्र राबवित आहे.
राजकीय :आज संपणार आमदार किशोर जोरगेवार यांचा वनवास, भाजपात घरवापसी
जुनोना चौक येथे तैबुल फातिमा अब्दुल रफिक शेख ही महिला आपल्या राहत्या घरी महिला व मुली आणून स्वतःच्या फायद्याकरिता वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
माहितीच्या आधारे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर व महिला पोलीस अंमलदार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सरिता मालू यांना सोबत घेतले. Prostitution
आरोपी महिला यांच्या घरी बनावट ग्राहक पाठविण्यात आला, त्यावेळी त्या ग्राहकाने इशारा करताच गुन्हे शाखेने त्याठिकाणी छापा टाकला, यावेळी आरोपी तैबुल फातिमा शेख यांना अटक करीत 4 महिलांची सुटका करण्यात आली.
पीडित महिलांना चंद्रपुरातील स्वधार गृह येथे पाठविण्यात आले, आरोपी महिलेवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये महिला व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोउपनी संतोष निंभोरकर, चेतन गज्जलवार, नितेश महात्मे, किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघाटे, प्रमोद कोटनाके, मिलिंद टेकाम, उषा लेडांगे, अपर्णा मानकर, छाया निकोडे, दीपिका सोडणार यांनी केली.