Rajura Assembly Constituency 26 ऑक्टोबर रोजी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, ब्रह्मपुरी व राजुरा विधानसभा क्षेत्राचा समावेश होता, ब्रह्मपुरी मधून कृष्णा सहारे, वरोरा करन देवतळे व राजुरा विधानसभा क्षेत्रातून देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर झाली होती.
Rajura Assembly Constituency देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीला माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर व खुशाल बोन्डे यांनी तीव्र नाराजी जाहीर करीत आम्हाला आयात उमेदवार नको अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषद द्वारा दिली.
राजकीय : आमदार किशोर जोरगेवार झाले भाजपवासी
देवराव भोंगळे हे मूळचे घुग्गुस येथील निवासी असून मागील वर्षभरापासून ते राजुरा विधानसभा क्षेत्रात घिरट्या घालत आहे, राजुरा क्षेत्रात ते जेष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा सन्मान करीत नाही, एकाही कार्यकर्त्यांना ते कार्यक्रमाचे निमंत्रण देत नाही, अश्या घमंडी लोकांना भाजपने उमेदवारी दिली असून त्याला आमचा विरोध आहे.
देवराव भोंगळे यांची उमेदवारी जाहीर होताच राजुरा क्षेत्रात हजारो कार्यकर्ते बैचेन झाले, आम्ही पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणार अशी तीव्र प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली. Rajura Assembly Constituency
पक्ष श्रेष्ठीने राजुरा येथील स्थानिक पदाधिकारी किंवा एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना उमेदवारी द्यावी आम्ही त्यांचे काम करू व विधानसभा निवडणूक जिंकू मात्र भोंगळे यांच्यासोबत आम्ही काम करणार नसल्याचा इशारा माजी आमदार संजय धोटे यांनी पत्रकार परिषद मार्फत दिला.
पक्ष श्रेष्ठीने यावर निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही वेगळा मार्ग स्वीकारू असा इशारा देण्यात आला.
धोटे पुढे म्हणाले की भोंगळे यांनी लोकसभा निवडणुकीत अति आत्मविश्वास दाखविला त्यामुळे राजुऱ्यातून भाजपला सर्वात कमी मतदान मिळाले होते, असले आयात केलेले उमेदवार आम्हाला नको आहे. याठिकाणी दादा चा वादा चालणार नाही.
आयोजित पत्रकार परिषदेत भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.