Rebellion in the Congress Party कांग्रेस पक्षाची यादी जाहीर झाल्यावर अनेक इच्छुकांचे निवडणूक लढण्याचे स्वप्न भंगले, चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षाने जाहीर केलेले अधिकृत उमेदवार हे हरण्यासाठी उभे केले असल्याची प्रतिक्रिया जनमानसात उमटू लागली आहे.
राजकीय : आघाडीत बिघाडी, शिवसेना जिल्हाप्रमुखाची बंडखोरी
Rebellion in the Congress Party चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून प्रवीण पडवेकर जे नगरसेवक निवडणूक हरले आहे, विधानसभा क्षेत्रात त्यांचा काडीमात्र संपर्क नाही, वरोरा विधानसभा क्षेत्रातून प्रवीण काकडे पक्षाशी संबंध नसलेले निव्वळ खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ अशी त्यांची ओळख तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संतोष रावत यांना उमेदवारी दिल्या गेली आहे.
रावत यांचा जनसंपर्क मूल क्षेत्रापर्यंत मर्यादित आहे.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षातर्फे डॉ. अभिलाषा गावतुरे व शिवसेना ठाकरे गटातर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शेवटच्या घटकापर्यंत जनसंपर्क वाढविला. मात्र ऐनवेळी तिसऱ्याचे नाव जाहीर झाल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे चिन्ह दिसू लागले.
राजकीय : कांग्रेसची यादी जाहीर आणि अनेकांचे स्वप्न भंगले
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे 29 ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे तर कांग्रेसच्या अभिलाषा गावतुरे आज 28 ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. Rebellion in the Congress Party
डॉ. गावतुरे यांनी मागील अनेक वर्षांपासून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काम सुरु केले होते, पक्षाने तयारीला लागा असा आदेश दिल्यावर त्यांनी कांग्रेस व भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून तळागाळात स्वतःची चांगली ओळख निर्माण केली. विधानसभा क्षेत्रात गावतुरे या अल्पावधीत लोकप्रिय झाल्या.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील 6 विधानसभा जागेवर कांग्रेसने दावा केला होता मात्र ज्या विधानसभा क्षेत्रात जो लोकप्रिय आहे त्याला उमेदवारी न देता भलत्याला उमेदवारी दिल्याने सध्या निष्ठावंत कांग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर कांग्रेसचे अच्छे दिन सुरु झाले होते मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात पुन्हा वाईट दिवसाचा शनी कांग्रेसच्या मागे लागला आहे.
नेत्यांचे विरोधी पक्षासोबत असलेले हितसंबंध आणि साट्या लोट्याचे राजकारण हे कांग्रेसच्या पराभवाचे मुख्य कारण या विधानसभा निवडणुकीत असणार आहे.