Shakti pradarshan : चंद्रपूर जिल्ह्यात 3 “वारांचे’ जोरदार शक्तिप्रदर्शन

Shakti pradarshan विधानसभा निवडणुकीच्या नामांकन रॅलीत आज जिल्ह्यातील 3 वारांनी आपली ताकद दाखवीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
Shakti pradarshan mungantiwar

Shakti pradarshan बल्लारपूर विधानसभेतील मतदारानों, तुम्हीच आहात बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार, आता विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेऊया’, अशी साद घालत प्रचंड गर्दीच्या साक्षीने ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी  महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरताना मुल शहरात बाजार चौक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढून विजयाची खात्री दिली.

निवडणूक नामांकन : चंद्रपूर जिल्ह्यात 57 उमेदवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

उमेदवारी अर्ज भरताना माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते, ज्येष्ठ भाजप नेते चंदनसिंह चंदेल,सौ. सपनाताई मुनगंटीवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,माजी जि प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले, अल्का आत्राम, विद्याताई देवाळकर, डॉ.  मंगेश गुलवाडे, रत्नमाला भोयर,चंदू मार्गोनवार, प्रभाकर भोयर, नंदू रणदिवे, विनोद देशमुख, राहुल संतोषवार, अजित मंगळगिरीवार, रामपाल सिंह, हनुमान काकडे, राजू बुद्धलवार, किशोर पंदीलवार, निमगडे गुरुजी, वंदना आगरकाटे,रोशनी खान, सुलभा पीपरे ,खेमा रायपुरे,पूजा डोहने,वर्षा लोनबले, किरण गापगते, मंगेश पोटवार, विशाल नागुलवार यासह आदि भाजपा व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Shakti pradarshan

यावेळी माध्यमांशी बोलताना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी आणखी एक पाऊल आज टाकत आहे. माता महाकालीचा आशीर्वाद घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सज्ज झालो आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वादाची ऊर्जा माझ्यासोबत आहे. सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहताना जनकल्याणाचा वसा पुढे चालविण्याचे ध्येय आहे.’ विकासाचा झंझावात कायम ठेवून बल्लारपूर मतदार संघ राज्यात अव्वल ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

पुढे बोलताना ना.मुनगंटीवार म्हणाले, ‘जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी मी काम केले आहे. आताही गोरगरीबांच्या कल्याणाचे ध्येय ठेवूनच मी निवडणूक लढविणार आहे. अशा स्थितीत कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्या मनाचे ऐका. आपल्याला पुढील पाच वर्षे दुःखात घालवायची आहेत की आनंदात, याचा विचार करा, असे आवाहन करीत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या निवडणुकीत मी तुमचा उमेदवार म्हणून उभा नाही तर तुम्हीच सारे उमेदवार आहात, या शब्दांत जनतेच्या हृदयाला स्पर्श केला.  Shakti pradarshan

विजय वडेट्टीवार शक्तिप्रदर्शन

Shakti pradarshan wadettiwar

या महाराष्ट्र राज्याशी आमच्या छत्तीसगड राज्याचे अतिशय जवळचे नाते आहे. संतांच्या या पावन भूमीला, छत्रपती शिवाजी महाराज,थोर क्रांतिकारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांचा वारसा लाभला. मात्र महाराष्ट्र द्रोही भाजपवाल्यांनी सत्ता कारणासाठी महाराष्ट्र संस्कृतीला बदनाम केले. तसेच महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळा निर्मिती कार्यातही कमिशन खोरी केली. Shakti pradarshan

अशा महापापी सत्तापिपासुंना त्यांची जागा दाखविण्यासाठी आपण सजग राहावे. ही लढाई स्वाभिमानी महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. असे प्रतिपादन छत्तीसगड राज्याची माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले. ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नामांकन दाखल प्रसंगी ब्रम्हपुरी येथे आयोजित सभेत बोलत होते. Shakti pradarshan

आज महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी येथील निवडणूक निर्णय अधिकारी  कार्यालयात नामांकन दाखल केले. तत्पूर्वी पार पडलेल्या सभेस छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंश बघेल, काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विजय वडेट्टीवार, गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव कीरसान, काँग्रेसचे ओझा, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार,बल्लारपूर – मुल विधानसभा क्षेत्र उमेदवार संतोषसिंह रावत, ॲड, राम मेश्राम, संदिप गड्डमवार, प्राचार्य जगनाडे, खेमराज तिडके,दिनेश चिटनुरवार, प्रमोद चिमूरकर, रमाकांत लोधे, नितिन गोहने, आदिवासीं नेते अवचितराव सयाम, ॲड. गोविंद भेंडारकर, धीरज शेडमाके, यशवंत दिघोरे, तसेच महिला आघाडी, युवक काँग्रेस, एनएसयुआय, तथा काँग्रेस पक्षाच्या सर्व सेल व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष यांची पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. Shakti pradarshan

यापुढे बोलताना छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, महाराष्ट्रातील काही भाजपवाल्यांनी सत्ता प्राप्तीसाठी आमदारांचा बाजार भरवून खोके देऊन त्यांची खरेदी केली. इथले उद्योग पळविल्या गेले. प्रचंड बेरोजगारी व महागाईचा जनतेला सामना करावा लागत आहे. हे महायुतीचे प्रचंड मोठे पाप असून महाराष्ट्रातील महायुती ही महाराष्ट्र द्रोही आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तर संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्र सुपुत्र विजय वडेट्टीवार यांनी विरोधी बाकावर बसून किल्ला लढविला. या महाराष्ट्राने लोकसभेत मोदींना पराभवाची धूळ चारून ट्रेलर दाखविला आगामी विधानसभेत या महायुतीला संपूर्ण पिक्चर दाखवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. Shakti pradarshan

किशोर जोरगेवार यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

Shakti pradarshan nivadnuk

आज, सोमवारी, आमदार किशोर जोरगेवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह जंगी शक्तिप्रदर्शन करत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी निघालेल्या रॅलीचे विविध ठिकाणी पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले.

            यावेळी भाजप नेते तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भाजप चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड, अशोक जीवतोडे, चंद्रपूर जिल्हा महानगर प्रमुख भरत गुप्ता,  शिवसेना महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, आरपीआय (आठवले गट) चे गौतम तोडे, हरीश दुर्योधन, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रज्वलंत कडू, सूरज पेदुलवार, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता कांबळे, प्रकाश देवतडे, वंदना हातगावकर, अमोल शेंडे, सलीम शेख, राशिद हुसेन, सविता दंढारे, सायली येरणे, विमल काटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. Shakti pradarshan

   चंद्रपूरचे अपक्ष आमदार यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ते भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) आणि मित्रपक्ष महायुतीच्या वतीने चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झाले असून आज सोमवारी त्यांनी भव्य मिरवणूक काढत आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. यावेळी निघालेल्या मिरवणुकीचे सर्वधर्मीयांच्या वतीने ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. दुपारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयातून सदर मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी महायुतीतील हजारो कार्यकर्ते आणि जोरगेवार समर्थक सहभागी झाले होते.

सदर भव्य मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गाने होत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, आपण दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मागील पाच वर्षांत आपण अनेक विकासकामे करू शकलो असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांनाही प्राधान्याने पूर्ण करायचे आहे. सुरू झालेला हा विकासपर्व अधिक गतीशील करायचा आहे, यासाठी आपली साथ आणि आशीर्वाद असाच राहावा, अशी विनंती केली. त्यानंतर त्यांनी आपला निवडणूक नामांकन अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!