shetkari sangathan महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दरम्यान राजकीय पक्ष व अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपली ताकद दाखवली.
shetkari sangathan चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात विरोधकांना हादरविणारं शक्ती प्रदर्शन आज बघायला मिळालं, शेतकरी संघटना व परिवर्तन महाशक्ती चे उमेदवार माजी आमदार वामनराव चटप यांनी जंगी प्रदर्शन केले.
जाहीरनामा : राज्याच्या प्रगतीचे गेमचेंजर भाजपचा जाहीरनामा
हजारोंच्या संख्येत विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या हक्काच्या माणसाला समर्थन देण्यासाठी राजुरा शहरात दाखल होत नामांकन रॅलीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.
अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने युवा, वयोवृद्ध महिला पुरुष या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते, वामनराव चटप हे सामाजिक कार्यात अग्रेसर, राजकीय अनुभव व थेट जनतेच्या मनातील माणूस म्हणून त्याची ओळख आहे.
राजुरा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात कांग्रेसचे आमदार सुभाष धोटे, भाजपचे देवराव भोंगळे उभे आहे, यंदा शेतकरी संघटनेची थेट लढत कांग्रेस पक्षासोबत असणार आहे व यावेळी राजुरा विधानसभेत परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे.