Today Shiv Sena candidate Sandip Girhe : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मोठा ट्विस्ट

Shiv Sena candidate Sandip Girhe जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

Shiv Sena candidate Sandip Girhe चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा जागेवर कांग्रेसने दावा केला असून सर्व जग कांग्रेस लढणार अशी शड्डू ठोकला होता मात्र मित्रपक्षाने काही जागेवर दावा केला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील काही जागेवरील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब अजूनही झाले नाही.

मात्र एकीकडे कांग्रेसची यादी जाहीर होण्यापूर्वी वरोरा विधानसभा क्षेत्रातून प्रवीण काकडे तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून संतोष रावत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला होता, विशेष म्हणजे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी वर्षभरापासून विधानसभा क्षेत्रात संघटन बांधणी सुरू केली होती.

मध्यंतरी सर्व जागा कांग्रेस लढविणार अशी बातमी बाहेर आल्यावर संदीप गिर्हे यांनी पक्ष जो आदेश देतील त्यावर आम्ही काम करू अशी भूमिका घेतली होती, मात्र 25 ऑक्टोबर रोजी संदीप गिर्हे यांना मातोश्री मधून बोलावण्यात आल्याने त्यांनी तात्काळ मुंबई गाठली व त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करा असे म्हटले आहे. Shiv Sena candidate Sandip Girhe

राजकीय : 28 ऑक्टोबर रोजी सुधीर मुनगंटीवार दाखल करणार उमेदवारी अर्ज

29 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भव्य शक्तिप्रदर्शन करीत संदीप गिर्हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, यामुळे आता बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सलग 3 वेळा भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विजय मिळविला आहे, त्यांच्यासमोर युवा नेते संदीप गिर्हे यांचं कडवे आव्हान असू शकते हे 30 ऑक्टोबर नंतर स्पष्ट होणार.

25 ऑक्टोबर रोजी किती अर्ज दाखल?

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक  निवडणुकीसाठी शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण पाच उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.

यात 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात नभा संदीप वाघमारे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया), 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात संतोषसिंह चंदनसिंह रावत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात सुधीर महादेव टोंगे (अपक्ष), 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात निरंक आणि 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात विनोद कवडूजी खोब्रागडे (अपक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले.

तर आज 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 7 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 11 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 22 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 23 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 10 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 7 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 80 अर्जांची उचल करण्यात आली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!