Shocking incident म्हैशी राखणाऱ्या शेतकऱ्याचा वाघाच्या भीतीने अखेर मृत्यू. बोरचांदली गावकऱ्यांनीच अखेर दुसऱ्या दिवशी शोधून काढला मृतदेह
Shocking incident (गुरू गुरनुले) मुल – मुल तालुक्यातील मौजा बोरचांदली येथील शेतकरी तथा स्वतःचा दुधाचा व्यवसाय करणारा शेतकरी शैलेश प्रभाकर कटकमवार वय (४२) हा आपल्या म्हैसी घेऊन उमा नदीच्या काठावर चरायला घेऊन गेला असता अचानक त्याला वाघ दिसला व वाघाला घाबरुन जाऊन नदीत पाणी पीत असणाऱ्या म्हैसची शेपटी पकडुन पाण्यात गेला, परंतु तो परतच् बाहेर आला नाही. आणी त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी ९-०० वाजता गावकऱ्यांच्या प्रयत्नाने मिळाला.
अवश्य वाचा : कांग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून
तालुक्यातील बोरचांदली येथील शेतकरी शैलेश प्रभाकर कटकमवार वय वर्ष (४२) दिनांक ३० सप्टेम्बर २०२४ रोजी त्याच्या दैंनदिनी नुसार आपल्या म्हैसी घेऊन उमा नदीच्या मोठ्या पुलाच्या काही अंतरावर म्हैसी चारत असताना जवळच त्याला वाघ दिसला.त्यामुळे वाघाला घाबरून शैलेशने म्हैसीची शेपटी पकडून पाण्यात उडी मारली. त्यामुळे वाघाच्या हल्यातून कसातरी वाचला.परंतु मृत्यूची आलेली वेळ ही अटळ असते, ही म्हण अखेर दुसऱ्या दिवशी खरी ठरली. Shocking incident
वाघाच्या भीतीने पाण्यात शेपटी धरुन बुडालेला शैलेश गावकऱ्यांना शोधूनही दिसला नाही. करीता मुल पोलिसांना याबाबतची तक्रार दिली. असता महसूल व पोलिस प्रशासन जागे झाले व डोंगा बोलाऊन दिवसभर व रात्रीही शोध घेतला परंतु प्रशासकीय यंत्रणेकडून अत्यावश्यक साधने वेळेवर उपलब्ध न झाल्याने त्या दिवशी शैलेशचा शोध घेता आला नाही. म्हणून प्रशासनाबाबत गावकरी नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी १/१०/२०२४ रोजी सकाळी बोरचांदली गावकऱ्यांनी कांग्रेस नेते सी.डी सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांना फोन करुन शैलेश मिळाला नाही अशी माहिती दिली असता गावकऱ्यांची तळमळ व हाक ऐकून तात्काळ महसूल व पोलिस प्रशासनास आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने जागे केले.
तहसीलदार मोरे मॅडम, पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांना आपण गंभीर दखल घ्यावी व शैलेशचा शोध लावा. अन्यथा गावकरी भडकतील. तात्काळ कांग्रेस कार्यकर्त्यांना घटनास्थळी पाठविले. यामधे राजू पाटील मारकवार, घनश्याम येणुरकर, गुरु गुरनुले, धनराज रामटेके,राजेंद्र वाढई हे घटनास्थळी जाऊन तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना ग्रामस्थांसमोर फोन करून तात्काळ घटनास्थळी यायला सांगितले. Shocking incident
तेव्हा शोध कार्य सुरूच होते. आणि गावकऱ्यांच्या पुढाकाराने ढिवर बांधवांच्या मदतीने जाळं टाकून पुन्हा शोध कार्य सुरु केले असता शैलेशचा मृत्यदेह हाती लागला. मृत्यूदेह बाहेर काढत असताना शेकडो गावकरी उपस्थित होते. नदीपात्रातच घटना स्थळाचा पंचनामा केला.
त्यावेळी माजी सरपंच संजय कुंठावार, राजू पाटील मारकवार, महेश कटकमवार, अमित येंनगंटीवार,प्रभाकर कटकमव्वार, पोलिस पाटील मडावी, श्रीकांत पोरेड्डीवार, अनिल कुंठावार, राकेश येनुगवार, नितेश येणुग्वार, शैलेशचे कुटुंबीय व शेकडो गावकरी उपस्थित होते. मृत्युदेह शविच्छेदनसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून विच्छेदन झाल्यानंतर दुपारी १ वाजता मृतदेह गावकऱ्यांच्या स्वाधीन केले. पुढील तपास मुल पोलिस करीत आहे.