Railway Engine : चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वे इंजिनचा अपघात

railway engine गुरू गुरनुले रेल्वेच्या दोन इंजिंनमधे धडक चार कर्मचारी जिल्हा रुग्णालयात भरती

Railway engine मुल – रेल्वे रुळाची देखभाल करणाऱ्या दोन एम.पी. टी.रेल्वे इंजिन एकमेकांना आदळल्याने रेल्वेचे काम करणारे कर्मचारी जखमी झाल्याची घटना मुल रेल्वे स्टेशन जवळच मुल चिंचोली मार्गावर ५ /१०/२०२४ रोजी शनिवारी सकाळी ५.३० वाजता घडली.

अवश्य वाचा : गडचांदुरात स्कुल बस पलटली

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळाचे काम करण्यासाठी एक एमपीटी इंजिन आधीच उभी होती. याच दरम्यान मुल रेल्वे स्टेशंनकडे येणाऱ्या दुसऱ्या एमपीटी इंजिनला जबर धडक दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील द.पू. रेल्वे मार्गावरील मुल रेल्वे स्टेशनवर रेल्वे रुळाचे काम रेल्वे कर्मचारी करीत असताना उभ्या असलेल्या दुसऱ्या इंजिनला धडक दिली.

यामधील काम करणारे चार कर्मचारी दिवाकर जे.ई.ट्रक मशीन वय (३५) ,संजित कुमार टेक्निशियन वय (३५), पुरुषोत्तम प्रसाद टेक्निशियन वय (३५), ओमप्रकाश साहू टेक्निशियन वय (५०), हे कर्मचारी जखमी झाले. इंजिनची धडक दिल्याने जोरदार आवाज आला. व जवळच असलेले नागरिक भयभीत झाले.

या जबर धडकेने एका इंजिनच्या समोरचा भाग पूर्ण क्षतिग्रस्त झाला. असता कर्मचारी जखमी झाल्याने तात्काळ जखमींना मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. पुढील तपास रेल्वे विभाग करीत असल्याचे समजले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!