today chandrapur news : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात हद्दपारीची पुनरावृत्ती

today chandrapur news राजकीय दबावातून पोलीस विभागाने हद्दपारीची नोटीस बजावल्याचा गंभीर आरोप 5 ऑक्टोबर रोजी स्थानीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केला आहे.


Today chandrapur news काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असून त्यापूर्वीचं राजकीय द्वंद्वयुद्ध सुरू झाले असल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात बघायला मिळत आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्याची तयारी मागील 2 वर्षांपूर्वी पासून सुरू केली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात वर्ष 2009 पासून सुधीर मुनगंटीवार आमदार आहे हे विशेष.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वे इंजिन आपसात धडकले


पत्रकार परिषदेत संदीप गिर्हे म्हणाले की माझ्यावर विविध कलमांतर्गत व प्रतिबंधात्मक कारवाई असे एकूण 12 गुन्हे दाखल होते, आतापर्यंत 8 गुन्ह्यात माझी निर्दोष मुक्तता झाली असून उर्वरित 4 गुन्हे हे राजकीय आंदोलनाचे आहे, असे असतानाही एका राजकीय नेत्यांच्या दबावाखाली मला हद्दपार करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे.

निशाणा कुणाला?


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला हद्दपार कारवाई करण्यासंदर्भात चाललेली धडपड म्हणजेच राजकीय विरोधक संपविण्याचा हा प्रकार आहे. Today chandrapur news


संदीप गिर्हे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला, जे लोक हद्दपार होते ते आज पालकमंत्री यांच्या सोबत बसतात, नुकतीच शहरात घडलेल्या कुख्यात गुंड हाजी सरवर यांच्या हत्येत भाजपचा पदाधिकारी सामील होता, अश्या लोकांना भाजप पक्षात प्रवेश चालतो मात्र कुणी विरोधक असता कामा नये अशी स्वयंघोषित विकासपुरुष यांची भूमिका दिसून येत आहे.


लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव त्यांच्या पचनी पडलेला नाही त्यामुळे आता विधानसभेत सुद्धा पराभव होणार अशी स्थिती निर्माण झाली, त्यामुळे माझ्यासारख्या शिवसैनिकाला निवडणुकीच्या महासंग्रामातून कस डावलता येणार याची तयारी विकासपुरुष यांनी प्रशासनामार्फत सुरू केली आहे.


शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांना बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात जनसामान्य नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे, त्यामुळे राजकीय करिअर संपुष्टात आणण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोप गिर्हे यांनी केला, आपण बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात हजारो कोटी रुपये खर्च करून विकास केला असा गवगवा करणाऱ्या विकास पुरुषांनी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांला घाबरण्याचे कारण काय? असा प्रश्न यावेळी गिर्हे यांनी उपस्थित केला आहे. Shivsena ubt

महत्त्वाचे : ब्रेक निकामी, बस पलटली

निवडणुकीपूर्वी हद्दपारीच्या राजकारणाने सध्या राजकीय वातावरण गढूळ होत आहे, काही वर्षांपूर्वी निवडणुकीच्या काळात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई झाली होती, मात्र त्या कारवाई नंतर धानोरकर यांनी राजकारणात दमदार पुनरागमन करीत भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांचा पराभव केला होता.

इतक्या वर्षांनी पुन्हा त्या परिस्थितीची पुनरावृत्ती होताना दिसत आहे, यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात विविध चर्चाना पेव फुटला असून संदीप गिर्हे निवडणूकित धानोरकर सारखेच जायंट किलर म्हणून उदयास येणार आहे. Shivsena ubt

9 ऑक्टोबर सकाळी संदीप गिर्हे यांना पोलीस प्रशासन समोर जाऊन हद्दपारीच्या नोटीसीला उत्तर द्यायचे आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!