abhilasha gaoture banner निवडणूक म्हटली की राजकारण, मात्र आता राजकारणाची पातळी खालच्या स्तरावर गेली आहे.
abhilasha gaoture banner निवडणुकीत बलाढ्य उमेदवारांच्या पुढे सामान्य कार्यकर्ता उभा राहिला तर काही अडचणी जरूर निर्माण होतात मात्र सामान्य कार्यकर्त्याला जेव्हा मतदारांचा जबरदस्त पाठिंबा मिळतो त्यावेळी बलाढ्य उमेदवार हा घाबरतो आणि त्यावेळी राजकारण खालच्या स्तरावर जाते.
तर चंद्रपुरात 950 कोटीचा फ्लायओव्हर
अशीच एक घटना बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सतत घडत आहे, या विधानसभा क्षेत्रात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत हे कांग्रेसकडून उमेदवार आहे तर दोघांनाही या निवडणुकीत अपक्ष महिला उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. abhilasha gaoture banner
कमळ आणि पंजा पेक्षा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात केटली ने वातावरण टाईट केले आहे, दिवसेंदिवस गावकऱ्यांचा वाढता पाठिंबा प्रस्थापित पक्षांच्या पायाखालची वाळू सरकवीत आहे.
त्यामुळे अभिलाषा गावतुरे यांच्या बॅनर वर 2 दिवसांपूर्वी शेण फेकण्यात आले तर आता त्यांचे बॅनर फाडण्याचे काम सुरू आहे. या प्रकारामुळे गावतुरे यांच्या विषयी सहानुभूतीची लाट पसरत आहे.
महिला उमेदवाराला बलाढ्य उमेदवार विरोधात लढत देताना कशाप्रकारे खच्चीकरण केल्या जात आहे असे उदाहरण बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बघायला मिळत आहे. abhilasha gaoture banner
अपक्ष महिला उमेदवारांच्या बॅनर वर शेणाचा मारा
डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी कांग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती मात्र धनशक्ती च्या मोठ्या वापराने त्यांची उमेदवारीला बगल देण्यात आला, मात्र एखाद्या रणरागिणीप्रमाणे गावतुरे यांनी दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा आधार न घेता अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
विशेष बाब म्हणजे डॉ. गावतुरे यांचं नाव बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी काही नवे नाही, त्यांनी भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य या क्षेत्रात केले, त्यामुळे आता नागरिकांनी गावतुरे यांना पाठबळ देण्याचे काम सुरू केले आहे. abhilasha gaoture banner
त्यांच्या कार्याची दखल व मतदारसंघात आता बदल हवा या भावनेमुळे नागरिक त्यांना प्रचंड प्रमाणात पाठिंबा दर्शवित आहे, त्यामुळे विरोधी पक्ष त्यांच्या प्रचारातील आघाडीला ब्रेक लावण्याचे काम करीत आहे. येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी या सर्व घटनेच्या विरुद्ध मतदार मतदानातून उत्तर देणार असा विश्वास अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी व्यक्त केला आहे.