Accident Report : नाटक बघण्यासाठी गेले आणि घात झाला

Accident reports

Accident reports सावली तालुक्यात बुधवारी 27 नोव्हेम्बर रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास बोथली-हिरापूर मार्गावरील मार्कण्डेय विद्यालयासमोर दुचाकी व ट्रॅक्टर च्या अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.


शेतात काम करून ट्रॅक्टर क्रमांक mh 34 ap 1042 हि रस्त्याच्या कडेला उभी लावली होती, ट्रॅक्टर चे लाईट चालकाने सुरु ठेवत आपल्या सहकार्याची वाट बघत होता त्यावेळी दुचाकी क्रमांक mh 34 cl 3229 वर ट्रिपल सीट प्रवास करणारे युवकांनी भरधाव वेगात येत उभ्या ट्रॅक्टर ला जोरदार धडक दिली.

ताडोब्यात 3 गिधाडांचा मृत्यू, कारण अस्पष्ट


या धडकेत 18 वर्षीय हर्षद दंडावार रा. बोरचांदली मूल हा जागीच ठार झाला.
दुचाकीवरील 20 वर्षीय साहिल नंदू गणेशकर रा. भंगराम तळोधी व 21 वर्षीय साहिल अशोक कोसमशीले रा. बोथली हे गंभीर जखमी झाले होते.


त्यांना परिसरातील नागरिकांनी व सावली पोलिसांनी तात्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले मात्र दोघांचाही उपचाराअंती मृत्यू झाला.


बोथली ते हिरापूर या मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरु आहे, बुधवारी रात्री तीन युवक हिरापूर येथे नाटक बघण्यासाठी जात होते मात्र तिन्ही मित्रांचा वाटेत घात झाला.


युवकांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, अपघात प्रकरणाचा पुढील तपास सावली पोलीस करीत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!