Air quality index
Air quality index काळा कोळशा व औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे, सोबतच जिल्ह्यात वायू प्रदूषण, जल व ध्वनी प्रदूषणात सुद्धा जिल्हा देशाच्या नकाशात पुढे आला आहे, यावर आता नियंत्रण हवे अन्यथा पुढील काळात परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता पर्यावरण तज्ञ व ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी वर्तविली आहे.
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, वर्षातील 27 वा बळी
आधीच प्रदुषित असलेल्या चंद्रपुर मध्ये हिवाळ्यात प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे विशेषतः थर्मल पॉवर स्टेशन च्या धुळीमुळे प्रदूषनात पुन्हा वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते. Air quality index
विशेष म्हणजे सुक्ष्म धूलिकनाचे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे. नोव्हेबर महिन्याच्या एकूण ३० दिवसापैकीं चंद्रपुर शहरातील ३० दिवस प्रदूषित होते. (Moderate AQI २९ दीवस १०१-२००, तर १ दिवस Poor AQI २०१-३००) . अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यानी दिली.
शहरातील प्रदूषण निर्देशांक
● ०-५० AQI (Good) निर्देशांक आरोग्यासाठी चांगला मानला जातो.असा येथे एकही दिवस नव्हता.
●५१-१०० AQI ( Satisfactory) निर्देशांक हा सुद्धा एकही दिवस नव्हता.
●१०१ -२०० AQI ( Moderate) निर्देशांक सर्वसाधारण प्रदूषित श्रेणीत येतो.असे येथे २९ दिवस आढळले
२०१-३०० AQI (Poor) निर्देशांक असून,असा केवळ एक दिवस (१९ नोव्हेंबर) आढळला.
समाधानाची बाब म्हणजे ३०१-४०० AQI(Very Poor) निर्देशांक आणि ४०१-५०० AQI (Severe)निर्देशांक हे धोकादायक प्रदूषण मानले जाते.हे प्रदूषण येथे आढळले नाही.
हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी कमीत कमी 3 तर जास्तीत जास्त 8 प्रदुषकाना प्रमाण मानले जाते. त्यात धूलिकण,2.5,10. ओझोन,कार्बन मोनोकसाईड, सल्फर डाय ओकसाईड, नायट्रोजन डाय ओकसाईड, अमोनिया, लीड ह्या प्रदूषकांना मिळून निर्देशांक काढला जातो. Air quality index
प्रदूषणाची कारणे
वाहनांची वाढती संख्या ,त्यातून निघनारा धूर ,धूळ , रस्त्यावरील धूळ,कचरा ज्वलन ,बांधकाम, स्थानिक थर्मल पॉवर उद्योग ,इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदूषनात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
प्रत्येक शहरात अलीकडे विकासासाठी विविध बांधकाम, रस्ते बांधणे सुरू असते त्यातच वाहनाच्या संख्येत वाढ होत आहे.त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते. बहुतेक शहरात सुद्धा अश्याच समस्या निर्माण होत असल्याने प्रदूषणात सतत वाढ होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते. Air quality index
प्रदूषणामुळे रोगराईत वाढ
हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते.थंडी मुळे आणि संथ वाऱ्या मुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात.पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चागला मानला जात असे परंतु अलीकडे प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. प्रदूषणामुळे आधिच श्वसनाच्या रोग् असणाऱ्या ना हानिकारक असते ,तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात.दमा, ब्रॉकाय टिस, टीबी,हृदय रोग आणि मानसिक रोग वाढतात.
प्रदूषण नियंत्रण कसे होणार?
अलीकडे औद्योगिक क्षेत्रात सर्वाधिक प्रदूषण असले तरी महाराष्ट्रात सर्वच जील्ह्यात प्रदूषण वाढले आहे.वाढती वाहने,धुळीचे रस्ते, कचरा ज्वलन,कोळसा ज्वलन,थर्मल पॉवर स्टेशन आणि शहरातील व्यावसाईक प्रतिष्ठाण कारणीभूत असतात.