Battle of the Constitution : ही मनुस्मृती विरुद्ध संविधानाची लढाई – विजय वडेट्टीवार

Battle of the Constitution गेल्या दहा वर्षात केंद्रातील मोदी सरकारने जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून केवळ व्यापारी हित जोपासत देशातील गोरगरीब जनतेला महागाईच्या आगीत झोकले.

Battle of the Constitution आज तरुणांपुढें रोजगाराचा गंभीर प्रश्न, मुली, महिलांवरील वाढलेले अत्याचाराचे प्रमाण, बेपत्ता झालेल्या  महिलांचा अजूनही शोध नाही. याचा राज्यातही समान अनिष्ट परीणाम जाणवत आहे.

भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात

या विवीध कारणांमुळे देश व राज्यातील जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. आता होऊ घातलेली महाराष्ट्राची निवडणूक हि देशाला नवी दिशा देणारी असुन मनुस्मृतीच्या विळख्यातून देश वाचवायचा असेल तर मनुस्मृती विरूध्द सुरु असलेल्या संविधान बचावच्या लढाईत सहभागी व्हा असे आव्हान राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.ते सावली तालुक्यांत कार्यकर्ता संवाद बैठकीत मार्गदर्शनक म्हणून बोलत होते. Battle of the Constitution

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी  सावली तालुक्यातील सिर्सी, साखरी, हरंबा, लोंढोली, कडोली, डोनाळा, उपरी, कापसी, नीलसनी, व्याहाड (बूज) वाघोली (बुटी) गाव भेटीतून काँग्रेस तसेच महाविकास आघाडी व सर घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची संवाद साधला.

यावेळी मार्गदर्शनपर बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपा तथा महायुतीने प्रत्येकाला १५ लाख देऊं अशी खोटी आमिषे दाखवून केंद्रात सरकार स्थापन केली. यानंतर स्वाय्यत संस्थांना हाताशी धरून पक्ष फोडीसाठी कट कारस्थान रचून महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम केले. पक्ष फोडले, लोकांची घरे फोडली.शिवरायांचा पुतळा निर्मितीत कमिशन खोरी करून त्यांचा अपमान केला. Battle of the Constitution

खोटी आश्वासने पोकळ योजना, जाती धर्मामध्ये विभागून सत्ता प्राप्तीसाठी वाट्टेल ते प्रकार महायुती कडून सुरु आहे. मात्र देशांतील व महाराष्ट्रातील सुज्ञ जनता यांनी महायुतीला नाकारून लोकसभेत संविधान वाचवण्यासाठी लढाई लढली. हेच महापापी सरकार आता 15 लाखावरुन 1500 वर आले असून महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून लाडकी बहीण योजना घेऊन मिरवत आहे. अशी टीका देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महायुती सरकारवर केली.

संकट अजूनही टळलेले नाही. येत्या 20 नोव्हेंबर रोजी देशातील व राज्यातील बहुजनांना गुलाम बनवू पाहणाऱ्या,महाराष्ट्राचे वैभव व स्वाभिमान गुजरात चरणी गहाण ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील सत्तापीपासू महायुतीला आपल्या मतदानातून धडा शिकवून त्यांची जागा दाखवा असे आवाहनही त्यांनी उपस्थित त्यांना केले.

आयोजित बैठकीस सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने, राकेश गड्डमवार, विजय कोरेवार, किशोर गड्डमवार, कृष्णा राऊत,किशोर कारडे, संजय मेश्राम, अविनाश भुरसे, किशोर घोटेकर,तथा महाविकास आघाडी पदाधिकारी, सर्व ग्राम काँग्रेस अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!