bjp banner controversy भाजप नेते देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरमध्ये भाजप नेत्यांचे फोटो होते. मात्र, त्यामध्ये आमदार किशोर जोरगेवार यांचा फोटो नसल्याने भाजपच्याच एका गटाकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला.
bjp banner controversy त्यानंतर हे बॅनर काढून, नवीन बॅनर लावण्यात आले, ज्यामध्ये आमदार किशोर जोरगेवार यांचा फोटो टाकण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या बॅनरवर आमदार किशोर जोरगेवार यांची ठसठशीत एन्ट्री झाल्याची चर्चा चंद्रपुरात सुरू झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात कुणाची आघाडी?
भाजप नेते देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील आझाद बाग मार्गावर शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष राऊल पावडे यांच्या वतीने लावले होते. त्यामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, विधानसभा प्रमुख प्रमोद कळू, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांचे फोटो होते.
सकाळच्या सुमारास हे बॅनर दिसताच भाजपच्या एका वर्तुळात खळबळ माजली. “सदर बॅनरवर आमदार किशोर जोरगेवार यांचा फोटो नाही,” अशा चर्चा शहरात रंगू लागल्या. त्यामुळे हे बॅनर तात्काळ काढण्यात आले आणि आमदार किशोर जोरगेवार यांचा फोटो असलेले नवे बॅनर त्याच ठिकाणी लावण्यात आले.
या प्रकारामुळे चंद्रपूरच्या भाजप राजकारणात आमदार किशोर जोरगेवार यांना सन्मानजनक स्थान द्यावेच लागणार असल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांनी “ग्रँड एन्ट्री” केली असल्याचे स्पष्ट होत आहे.