Bjp Campaign : आमदार जोरगेवार यांची ग्रामीण भागात पदयात्रा

Bjp Campaign मागील पाच वर्षांत आपण शहरी भागाच्या विकासकामांसह ग्रामिण भागातील विकासकामांनाही प्राधान्य दिले. अनेक गावांत आपण रस्ते, समाजभवन तयार केले आहे.

Bjp Campaign विशेष म्हणजे आपण धानोरा बॅरेजच्या टीपीआरला मंजुरी मिळवून दिली असून हा बॅरेज तयार होताच पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच मतदारसंघ पांदनयुक्त करण्याचा आपला संकल्प असून अनेक गावांत पांदन रस्ते तयार केले असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पुन्हा राजकीय नाट्यक्रम

आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार हे मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांशी संवाद साधत केलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली. Bjp Campaign

यावेळी भाजपचे ग्रामीण तालुका अध्यक्ष नामदेव डाऊले, भाजप पदाधिकारी विजय आगरे, विनोद खेवले यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरी भागासह आता ग्रामिण भागातही प्रचाराचा मोर्चा वढवला असून, काल रात्री आणि आज सकाळी त्यांनी ग्रामिण भागात बैठक आणि पदयात्रेच्या माध्यमातून प्रचार केला. Bjp Campaign

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चंद्रपुरात

यावेळी त्यांनी घुग्घुस, चिंचाळा यासह मतदारसंघातील इतर गावांना भेटी देऊन पाच वर्षांत केलेली कामे सांगितली.

ग्रामिण भागात आपण मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिक भर दिला आहे. येथे सामाजिक सभागृह, रस्ते, नाली यासह अनेक विकासकामे आपण पाच वर्षांत केली आहेत. अनेक गावांत पांदन रस्त्यासाठी आपण मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.

पुढेही अनेक पांदन रस्त्यांची कामे प्रस्तावित असून ती करण्याचा संकल्प आपण केला आहे. धानोरा बॅरेजसाठी आपण अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होतो. अखेर या बॅरेजच्या टीपीआरला मंजुरी देण्यात आली आहे. Bjp Campaign

या प्रकल्पामुळे ग्रामिण भागातील पाणी प्रश्न सुटणार असून 5 ते 6 हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रचारादरम्यान ग्रामस्थांचाही मोठा प्रतिसाद आमदार किशोर जोरगेवार यांना मिळत असल्याचे दिसून आले.

आम आदमी पक्षाच्या नकोडा अध्यक्षांचा भाजपात प्रवेश

Jorgewar bjp


आम आदमी पक्षाचे नकोडा गावाचे अध्यक्ष गणपत गेडाम यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ग्रामिण भागाचा विकास झाला असून त्यांचे हात आणखी बळकट करण्यासाठी आपण पक्षात प्रवेश केला असल्याचे गणपत गेडाम यांनी म्हटले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकून गणपत गेडाम यांचे पक्षात स्वागत केले आहे.

15 नोव्हेंबर रोजी शहरात नो पार्किंग व नो हॉकर्स झोन

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!