Cash seized : 60 लाखांची रोकड व भाजपचे प्रचारसाहित्य चंद्रपुरात चाललंय तरी काय?

Cash seized चंद्रपूर जिल्ह्यात प्रचारतोफा थंडावल्यानंतर भाजप व कांग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली, त्यानंतर प्रमुख उमेदवारांवर गुन्हेही दाखल झाले मात्र आता तर 60 लाखांची रोकड व प्रचार साहित्य जप्त केल्याने निवडणुकीत चालणारा घोडेबाजार सुद्धा उघडकीस आला आहे.

Cash seized राजुरा विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी मतदारांना आमिष देण्यासाठी ६० लाखांची रोकड लपवून ठेवली होती. अशी तक्रार राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाने केल्यानंतर निवडणूक आयोगाने रात्री उशिरा गडचांदूर येथील एका घरावर धाड टाकत ही रक्कम जप्त केली.

राजकीय हाणामारीत उमेदवारांवर गुन्हे दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीनुसार, संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात बाहेरील महिला – पुरुष व बाऊंसर नेमून मतदारांना पैसे वाटप करण्याचा कट रचला जात असल्याचे समोर आले आहे. Cash seized

आयोगाची सतर्कता आणि निवडणुकीतील गैरप्रकार उघड
निवडणूक आयोगाच्या टीमने रात्रभर तपास करून ही मोठी कारवाई केली. जप्त केलेली रक्कम निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आली असून, या घटनेने निवडणुकीच्या निष्पक्षतेवर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या कारवाईत रोकड व भाजपचे प्रचार साहित्य बुथ निहाय यादी जप्त करण्यात आली असून या प्रकरणी अद्यापही कुणाला अटक करण्यात आलेली नाही.

या घटनेमुळे राजुरा विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून, निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!