cast your vote लोकशाहीच्या पर्वणीचा सुंदर दिवस म्हणजे मतदानाचा दिवस. आज आपण सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांवर गुन्हे दाखल
Cast your vote आपल्या क्षेत्रातील प्रश्न, क्षेत्रांचा सर्वांगीण विकास, त्यासोबतच संविधानाने दिलेल्या अधिकाराचा परिपूर्ण वापर करण्यासाठी आपण सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावं, तसेच नव मतदारांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून भविष्याचा वेध घेण्यासाठी आपलं मतदान अत्यंत आवश्यक आहे.
यासाठी सर्वांनी घराबाहेर पडून मतदानाचा टक्का वाढवावा व लोकशाहीचा उत्सव साजरा करावा असे आवाहन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.
मतदानासाठी येणाऱ्या अडचणीं करिता प्रशासनाची मदत घेऊन मतदान यादीतील आपले नाव तपासून मतदान करावे असे देखील आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.