Chandrapur Assembly Election : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात रडीचा खोटा डाव..!

Chandrapur Assembly Election प्रेम आणि युद्धात सगळं मान्य असतं, अशी म्हण आहे मात्र ही म्हण राजकारणात शिरल्याने त्यामध्ये सगळंच मान्य असते अशी प्रचिती सिद्ध होत आहे.

Chandrapur Assembly Election नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाला, अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली मात्र त्यामध्ये अनेकांना तिकीट नाकारण्यात आले, विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय पक्षात हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडला असून आता त्याच पक्षातील बंडखोर आव्हान द्यायला तयार झाले आहे, मात्र हे करताना चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात रडणारे नेते असा उदय झाला, आणि त्या भावनेत खोट्या शब्दांचा एक उड्डाणपूल निर्माण करण्यात आला मात्र आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी त्या खोट्या उड्डाणपूलाला काही क्षणात जमीनदोस्त केले.

चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार हे रिंगणात आहे, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करीत जोरगेवार यांनी तिकीट हिसकावली असे रडगाणं सध्या चंद्रपुरात जोरात वाजतंय, आणि ते खुद्द भाजपचे माजी सदस्य ब्रिजभूषण पाझारे वाजवीत आहे. Chandrapur Assembly Election

त्यांनी नुकतंच स्थानीय वाहिनीला मुलाखत दिली की माझ्यावर जोरगेवार यांनी अन्याय केला, माझ्या तोंडचा घास त्यांनी हिसकावून घेतला, ज्या दिवशी जोरगेवार यांच्या आई अम्मा उर्फ गंगुबाई जोरगेवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाला त्यादिवशी मी त्यांच्या चरणी स्पर्श करीत तुमच्या मुलाने माझ्यावर अन्याय केला मात्र मला आशीर्वाद द्या अशी माहिती पाझारे यांनी त्या मुलाखतीत सामायिक केली.

अम्मा चं निधन झालं त्यावेळी आमदार किशोर जोरगेवार हे राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाच्या संपर्कात होते, त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला होता, पण ऐनवेळी त्यांना थांबण्यास सांगितले, जोरगेवार घरी परतले व आपण आता अपक्ष निवडणूक लढू असे सांगितले पण नियतीला काही वेगळंच मान्य होते, भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी जोरगेवार यांना उमेदवारी देण्याचा निर्धार केला. Chandrapur Assembly Election

विशेष बाब म्हणजे भाजपच्या सर्व्हेत जोरगेवार हे अव्वल स्थानी होते, ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिल्हापरिषद निवडणूक किंवा विधानसभा व लोकसभा यामध्ये भाजप आपला सर्व्हे करतो त्यामध्ये ज्या नावाला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळते त्याला पक्ष उमेदवारी देत असतो.

मात्र हे पाझारे समजू शकले नाही त्यांनी भावनेच्या भरात अम्मा चं नाव काढलं आणि चुकले, त्यांनी खोटं भाष्य का केलं असावं? हा चर्चेचा विषय आहे, पण जिल्ह्यातील राजकारण्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक लढवावी, आपण कोणत्या मुद्द्यावर लढू शकतो यावर विचार करावा अशी प्रतिक्रिया आप चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी समाजमाध्यमातून दिली आहे. Chandrapur Assembly Election

जनता अश्या खोट्या राजकारणाला बळी पडणार नाही, प्रामाणिक पणे काम करा असा सल्ला राईकवार यांनी दिला आहे.

स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखती मध्ये पाझारे म्हणतात की चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे, रस्ते नाही, पाण्याची समस्या कायम आहे पण पाझारे साहेब आपण सलग 30 वर्षे भाजपात होता, पालकमंत्री आपले होते तर त्यांना सदर बाब आपण लक्षात का आणून दिली नाही? अमृत पाणी पुरवठा योजना ही केंद्राची आहे त्यावर आपण सत्तेत असताना कधी बोलला काय? प्रदूषणावर आपण आपली भूमिका कधी मांडली काय? जटपुरा गेट च्या वाहतूक कोंडीचा विषय खुद्द पालकमंत्री मुनगंटीवार यांनी हाती घेतला होता त्यावर अनेकदा बैठका घेण्यात आल्या, आमदार जोरगेवार यांनी सुद्धा अनेक प्रयत्न वाहतूक कोंडी सुटावी यासाठी केले होते, मात्र त्या काळात आपण कुठे होता? याचा थांगपत्ता नाही. Chandrapur Assembly Election

आपण दर विधानसभा निवडणुकीमध्ये काही दिवसांपूर्वी सक्रिय होतात आणि नंतर असक्रिय होतात हे जनतेने बघितले आहे.

ब्रिजभूषण पाझारे यांना तिकीट नाकारले त्यानंतर ते धाय मोकलून रडले, माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर जोरगेवार यांनी अन्याय केला असं रडगाणं त्यांनी सुरू केले आहे, पण वर्ष 2009 मध्ये किशोर जोरगेवार यांना विधानसभेचे तिकीट नाकारले होते त्यावेळी ते रडले नाही पण पक्षासोबत लढले, व नाना श्यामकुळे यांना विजयी करून दाखविले. Chandrapur Assembly Election

वर्ष 2014 पूर्वी जोरगेवार यांनी पुन्हा पक्षाला तिकीट मागण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी त्यांना पुन्हा नाकारले मात्र त्यांनी भाजपला राम राम करीत शिवसेनेतून निवडणूक लढवली आणि 50 हजार मते प्राप्त करीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

गुन्हेगारी : चंद्रपुरातील खंजर भाई जवळ मिळाली बंदूक

वर्ष 2014 ते 2019 पर्यंत किशोर जोरगेवार जनतेत गेले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्या पूर्ण कशा होतील यावर अनेक आंदोलने केली आणि 5 वर्षांनी अपक्ष म्हणून त्यांनी 72 हजारांचे मताधिक्य घेत भाजपच्या उमेदवाराचा विजयी रथ थांबविला. जोरगेवार त्या काळात रडले नाही ते जनतेच्या समस्या सुटाव्या यासाठी लढले आणि जिंकले.

कोरोना काळात त्यांनी गोर गरीब जनतेची मदत केली, निराधार नागरिकांना पोटभर जेवण मिळावे यासाठी अम्मा का टिफिन सुरू केला व आजही तो उपक्रम सुरू आहे. आपण म्हणता 200 युनिट पूर्ण झाले नाही पण सोलर आल्याने जोरगेवार यांनी जनतेला सबसिडी मिळावी यासाठी प्रयत्न का केला नाही असा पोरकटपणाचा प्रश्न यावेळी उपस्थित केला, पाझारे जी प्रधानमंत्री सुर्यघर योजनेत 3 kv सोलर साठी 78 हजारांची सबसिडी आहे हे आपण विसरला वाटतं. Chandrapur Assembly Election

happy Diwali ad

आपण निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उभे आहेत प्रामाणिकपणे निवडणूक लढली तर आपल्याला त्याचा लाभ होणार, भाजप सोडल्यावर सुद्धा आपण भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीला जात आहे, त्यांच्यासमक्ष रडत आहे, जनतेत तरी जा, कारण जनता आपला आमदार ठरविणार आहे, भाजप कार्यकर्ते नाही, आपण पक्ष सोडला पण कार्यकर्ते नाही अशी प्रचिती लोकांच्या मनात निर्माण होऊ नये म्हणजे झालं.

या सर्व प्रकरणी प्रामाणिक राजकारण म्हणजे कसं आणि काय हे आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी चांगलंच समजविले आहे.

क्रमशः…

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!