Chandrapur Assembly Election Results : चंद्रपूर विधानसभा निवडणूक निकाल 2019

Chandrapur Assembly Election Results विधानसभा निवडणुक 2024 ची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार प्रचारात व्यस्त आहे.

Chandrapur Assembly Election Results चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत वर्ष 2019 मध्ये अपक्ष म्हणून रिंगणात असलेले विद्यमान आमदार किशोर जोरगेवार हे सध्या भाजप पक्षातून निवडणूक लढत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

भाजप व कांग्रेस या राष्ट्रीय पक्षांचा आमदार जोरगेवार यांनी वर्ष 2019 मध्ये अक्षरशः धुव्वा उडविला होता, कांग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला आपली जमानत सुद्धा वाचविता आली नव्हती.

वर्ष 2019 च्या निवडणुकीचा निकाल काय होता? कुणाला किती मते मिळाली होती, यावर आपण माहिती जाणून घेऊया. Chandrapur Assembly Election Results

अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना 1 लाख 17 हजार 570 मते, भाजपचे नाना श्यामकुळे 44 हजार 909, वंचित बहुजन आघाडीचे अनिरुद्ध वनकर 15 हजार 403, कांग्रेसचे महेश मेंढे 14 हजार 284, पीपीआयडी नामदेव गेडाम 3 हजार 956, बसपा भिक्खू बुद्धशरण 1 हजार 772, आरपीआय के.एच चे बबन महादेव रामटेके 1 हजार 730, अपक्ष मनदीप गोराद्वार 884, अपक्ष तथागत पेटकर 679, Apoy च्या अमृता गोगुलवार 562, BRSP ज्योतिदास रामटेके 482, अपक्ष संदीप पेटकर 324 व नोटा ला 294 मते मिळाली होती.

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपचे श्यामकुळे यांचा तब्बल 72 हजार 661 मतांनी पराभव केला, अपक्ष उमेदवार म्हणून देशात सर्वाधिक मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवार यांचा आमदार जोरगेवार यांनी पराभव केला होता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!