Chandrapur Crimes
Chandrapur Crimes चित्रपटातील हिंसा बघून आजकाल युवक सदर हिंसा खऱ्या आयुष्यात साकारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, असाच दहशत पसरविण्याचा प्रयत्न चंद्रपुरातील 2 इसमानी केला, मात्र त्यांचा प्रयत्न रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने हाणून पाडला.
शहरातील बंगाली कॅम्प भागातील मुक्ती नगर कॉलोनी येथे दोघांनी 27 नोव्हेंबर ला रात्री 9 ते 9.30 वाजताच्या दरम्यान 40 वर्षीय राजेश उर्फ पागळ्या जानकीराम शिवणकर, राहणार अष्टभुजा वार्ड व 32 वर्षीय वाहनचालक अनिल गोरखनाथ सिंग राहणार अष्टभुजा हे दोघे कोयता व तलवार हातात घेऊन परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत होते. Chandrapur Crimes
नाटक बघायला गेले आणि वाटेत घात झाला
सदर प्रकाराची माहिती रामनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळताच त्यांनी तात्काळ बंगाली कॅम्प परिसर गाठत दोघांना अटक केली, पोलिसांनी दोघांकडून एक स्टीलची टोकदार तलवार व लोखंडी धारदार कोयता जप्त करीत 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दोन आरोपीपैकी शिवणकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती असून त्याच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हे रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले. Chandrapur Crimes
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक देवाजी नरोटे, सपोनि उगले, पोलीस कर्मचारी पेतरस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, आनंद खरात, प्रशांत शेंदरे, लालू यादव, अमोल गिरडकर, मनीषा मोरे, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता, रविकुमार ढेंगळे, प्रफुल पुप्पलवार, पंकज ठोंबरे, ब्लुटी साखरे यांनी केली.