chandrapur vidhan sabha 23 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा आमदार कोण हे निकालातून स्पष्ट होणार असून तत्पूर्वी विधानसभा क्षेत्रात कोण जिंकणार याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.
chandrapur vidhan sabha 20 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी मतदान पार पडलं, 16 उमेदवारांचे नशीब ईव्हीएम मशीन मध्ये बंद आहे, वर्ष 2019 मध्ये चंद्रपूर विधानसभेत 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
वर्ष 2019 मध्ये ना कांग्रेस चालली ना भाजप अपक्ष उमेदवाराची या क्षेत्रात लाट चालली आणि तब्बल 72 हजार मते घेत अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांचा विजय झाला. chandrapur vidhan sabha

यंदा चित्र काही वेगळे आहे, कांग्रेस पक्षातून प्रवीण पडवेकर हे निवडणुकीच्या रिंगणात जोरगेवार यांच्या पुढे होते, अपक्ष म्हणून आमदार झालेले जोरगेवार यांनी वर्ष 2024 मध्ये भाजप पक्षात प्रवेश करीत निवडणूक लढवली. chandrapur vidhan sabha
यंदा विधानसभा निवडणुकीत अनेक समीकरणे बदलली होती, मागच्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांना 1 लाख 17 हजार 570 मते मिळाली, भाजपचे नाना श्यामकुळे – 44 हजार 909, वंचित बहुजन आघाडी अनिरुद्ध वनकर – 15 हजार 403 तर कांग्रेसचे महेश मेंढे यांना 14 हजार 284 मतांवर समाधान मानावे लागले होते.
चंद्रपूर भाजपात वातावरण टाईट, बॅनर वरून सुरू झाला वाद

यंदा कांग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत विधानसभा क्षेत्रात बघायला मिळाली, भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार असताना त्यांचे अनेक नागरिकांसोबत चांगले संबंध या निवडणुकीत कामी आले, काही ठिकाणी भाजपचे पदाधिकारी यांनी आमच्या पक्षाला नको अपक्ष उमेदवाराला मतदान करा असे प्रकार अनेक ठिकाणी घडले. chandrapur vidhan sabha
कांग्रेस पक्षात सुद्धा हीच परिस्थिती मतदान प्रक्रियेत बघायला मिळाली, विशेष म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी 2 उमेदवार निवडणुकीत उभे राहिले. मतदान पार पडले, आता जिंकून कोण येणार याबाबत चर्चा रंगल्या आहे.
पेन्शन धारकांसाठी महत्वाची माहिती, ही प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा पेन्शन मिळणार नाही
शहरी भागात किशोर जोरगेवार यांचे नाव आघाडीवर असून ग्रामीण भागात कांग्रेस विरुद्ध भाजप अशी चर्चा आहे, काही नागरिकांनी तर उमेदवाराला किती मते मिळणार याचा थेट आकडाचं सांगितला.
चर्चे प्रमाणे किशोर जोरगेवार यांना 80 हजार तर पडवेकर यांना 50 ते 55 हजार मते मिळणार आहे, तर काही नागरिक कांग्रेसचे पडवेकर नवीन आमदार म्हणून निवडून येणार अशी चर्चा रंगलेली आहे.
अनेक ठिकाणी नागरिक सदर मतांच्या आकड्यांची गोळा बेरीज करताना दिसले. मात्र याबाबत अचूक निकाल 23 नोव्हेंबर रोजी नागरिकांपुढे येणार आहे.