congress pravin kakde : आपल्या हक्काच्या माणसाला निवडून द्या – खासदार प्रतापगढी

congress pravin kakde विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी खा. इम्रान प्रतापगढी यांची तोफ वरोऱ्यात धडकली.

congress pravin kakde शेरो-शायरी च्या माध्यमातून त्यांनी विरोधकांचा भरपूर समाचार घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथील मैदानावर खा. इम्रान प्रतापगढी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

मतदारांनी केला निर्धार आता पुन्हा जोरगेवार

आपल्या भाषणा दरम्यान त्यांनी शायरींच्या माध्यमातून विरोधकांवर जारेदार टिकास्त्र सोडले. ‘‘नफरत के बाजार मे अपने इमान को जिंदा रखना’’ या शायरीतून महायुतीच्या चुकीच्या राजकारणाला बळी न पडता. एकजुट राहुन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रविण काकडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. congress pravin kakde

मी एक महाराष्ट्राचा खासदार म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास देखील खा. इम्रान प्रतापगढ़ी यांनी व्यक्त केला. आपण दिलेले प्रत्येक मत हे फक्त उमेदवारांसाठी नसून धर्मांध शक्तीला दुर करण्यासाठी असेल, असे मत देखील खा. इम्रान प्रतापगढ़ी यांनी व्यक्त केले.

धडकी भरविणारे अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन

‘‘अपने हौसलो को बुलंद रखना, मै जीत के जश्न को फिर लौटुंगा’’ असे म्हणत त्यांनी उपस्थितांकडून दाद मिळवली. यावेळी मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी जाहीर सभेला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!