congress pravin padvekar वर्ष 1995 पासून चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत सतत पराभव झेलणाऱ्या कांग्रेस पक्षाला प्रवीण पडवेकर यांनी मताधिक्य मिळवून दिले.
congress pravin padvekar वर्ष 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कांग्रेस पक्षाचा पराभव झाला असला तरी कांग्रेस पक्षाने शेवटपर्यंत लढत देत 84 हजार 37 मते घेतली मागील 30 वर्षात कांग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत मिळालेले हे मोठे मताधिक्य आहे.
पडवेकर यांचा 22 हजार 804 मतांनी पराभव झाला, या निवडणुकीत पडवेकर यांना कांग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी साथ दिली नाही, त्यांना प्रचारात सुद्धा एकटे पाडण्यात आले.
जिल्ह्यातील धानोरकर-वडेट्टीवार यांच्या वादात पडवेकर यांची चांगलीच कोंडी झाली, जर धानोरकर गटाने पडवेकर यांना सहकार्य केले असते तर आज निकाल काही वेगळाच लागला असता कांग्रेस पक्ष्याचा या अडेलट्टूपणामुळे आज कांग्रेस पक्षाचा जिल्ह्यात लाजिरवाणा पराभव झाला. congress pravin padvekar
पडवेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर 23 इच्छुक उमेदवार नाराज झाले, यापैकी काही मोजक्या इच्छुकांनी पडवेकर यांना साथ दिली तर काहींनी धानोरकर गटाला सहकार्य केले.
वर्ष 1995 मध्ये कांग्रेस पक्षाकडून सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर विधानसभा जागा हिसकावली त्यानंतर सतत 30 वर्षे चंद्रपूर विधानसभा भाजपच्या ताब्यात आहे,). (वर्ष 2019 वगळता)
मुनगंटीवार व श्यामकुळे यांच्या समोर एकही सक्षम नेता कांग्रेस 30 वर्षाच्या काळात तयार करू शकली नाही, यंदा विधानसभा क्षेत्रातील वातावरण भाजप विरोधी होतं, मात्र उमेदवारी वडेट्टीवार यांच्या गटाला मिळाली त्यामुळे धानोरकर गटाने पडवेकर यांना सहकार्य करणे टाळले.
पडवेकर हे एकला चलो च्या भूमिकेत दिसले, त्यांनी भाजप उमेदवार जोरगेवार यांना शेवटपर्यंत लढत दिली, चंद्रपुरात कांग्रेसचा दुष्काळ संपणार अशी स्थिती होती मात्र तसे काही झालं नाही. congress pravin padvekar
अपक्ष उमेदवार यांनी गाजविले निवडणुकीचे मैदान
1995 ते वर्ष 2009 पर्यंत चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी केले तर वर्ष 2009 पासून नागपूरचे नाना श्यामकुळे यांनी 2019 पर्यंत भाजपचा झेंडा विधानसभेत रोवला, 19 मध्ये अपक्ष उमेदवार जोरगेवार यांनी श्यामकुळे यांचा 72 हजार मतांनी पराभव केला.
वर्ष 2014 मध्ये कांग्रेस उमेदवार महेश मेंढे यांना केवळ 25 हजार 140 मते मिळाली, कांग्रेस तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेली, 2019 मध्ये कांग्रेसची स्थिती विदारक झाली, उमेदवार महेश मेंढे यांना केवळ 14 हजार 284 मते मिळाली यावेळी कांग्रेस चौथ्या स्थानावर फेकल्या गेली.
चौथ्या स्थानावर असलेल्या कांग्रेस पक्षाला क्रमांक 1 वर कसे आणायचे असा पेच निर्माण झाला होता, वर्ष 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांची लाट आली या लाटेत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षाला मोठं मताधिक्य मिळालं. Congress
हे मताधिक्य विधानसभा निवडणुकीत असेच राहील हा आत्मविश्वास कांग्रेस पक्षाला नडला, आपण निवडणूक जिंकू या अंधारात संपूर्ण पक्ष राहिला, मात्र ऐनवेळी धानोरकर यांनी आपल्या भावाच्या उमेदवारी साठी चंद्रपूर ची जागा वडेट्टीवार गटाला सोडली आणि कांग्रेस पक्ष पुन्हा गटबाजी च्या घेऱ्यात सापडला.
चंद्रपूर जिल्ह्याचा नवीन पालकमंत्री कोण?
या संधीचा भाजपने चांगला वापर केला व पुन्हा भाजपने चंद्रपूर विधानसभा जिंकली, मात्र 2019 मध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या कांग्रेसने भरारी घेत दुसऱ्या स्थानावर झेप घेत मोठं मताधिक्य मिळविले. Congress
धानोरकर गटाचा पाठिंबा पडवेकर यांना मिळाला असता तर आज निकाल काही वेगळा असता अशी चर्चा कांग्रेस पक्षाच्या वर्तुळात रंगली आहे. विशेष बाब म्हणजे दर निवडणुकीत कांग्रेस पक्षाचा उमेदवार हा निवडणूक हरल्यावर जनतेशी सम्पर्क तोंडात अज्ञातवासात जातो आणि निवडणूक जाहीर झाली की परत येतो. Congress
यामुळे कांग्रेस पक्ष एकही सक्षम उमेदवार तयार करू शकली नाही, आणि उमेदवार मिळाला तर त्याला सहकार्य करण्याचे कौशल्य स्थानिक नेते दाखवीत नाही.