Controversy in BJP : चंद्रपूर जिल्ह्यातील “या’ विधानसभा क्षेत्रात भाजपचा वाद चव्हाट्यावर

Controversy in BJP चंद्रपूर: वरोरा विधानसभा क्षेत्रातील भाजपमध्ये अंतर्गत कलह बघायला मिळत आहे. मात्र हा कलह आता चव्हाट्यावर आला असून ऐन निवडणुकीच्या काळातच असे प्रकार घडत असल्याने भाजप उमेदवाराच्या मताधिक्यावर परिणाम पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Controversy in BJP शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी वरोरा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे संपर्कप्रमुख रमेश राजुरकर हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेकरिता चंद्रपूरला आपल्या वाहनाने येत असताना बोर्ड या गावाजवळ त्यांच्याच पार्टीचे उमेदवार करण देवतळे यांच्या सोशल मीडिया प्रतिनिधीच्या वाहनाने कट मारून अपघात करण्याचा प्रयत्न केला.

वरोरा विधानसभा क्षेत्रातील मुख्य लढत

या घटनेमध्ये रमेश राजूरकर यांच्यासह त्यांचा चालक थोडक्यात बचावले. विशेष म्हणजे; रमेश राजुरकर यांनी वरोरा विधानसभेसाठी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली होती. मात्र ऐनवेळी राजूरकर यांचे नाव कट करून करण देवतळे यांना उमेदवारी दिली. Controversy in BJP

तेव्हापासून राजुरकर आणि देवतळे यांच्यामध्ये फारसे सौख्य नसल्याची चर्चा वरोरा विधानसभा क्षेत्रात आहे. विशेष म्हणजे; देवतळे यांच्या उमेदवारीवरून या क्षेत्रामध्ये नाराजी नाट्यही रंगल्याचे बघायला मिळाले. दरम्यान वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या तडजोडीनंतर हे नाट्य शमले.असे असले तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये धूसफूस सुरूच आहे. Controversy in BJP

दरम्यान बोर्डा येथील घटनेवरून भाजप उमेदवार देवतळे आणि राजुरकर यांच्यातील वाद आता उघड होत आहे. या घटनेनंतर राजूरकर यांनी थेट महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे.

किशोर जोरगेवार यांच्या विजयी रॅली मध्ये मी येणार – गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य

निवडणुकीच्या काळात असा प्रकार घडल्याने त्याचा परिणाम भाजप उमेदवारावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थेट उपमुख्यमंत्र्याकडेच राजूरकर यांनी निवेदन दिल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस देवतळे यांना काय समज देतात याकडे नागरिकांची लक्ष लागले आहे.

अशी झाली झटापट…..

वरोरा येथून जवळच असलेल्या बोर्डा या गावाजवळ राजूरकर यांच्या वाहनाला देवतळे यांच्या सोशल मीडिया प्रतिनिधीच्या कार ने कट मारून अपघात करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कार्यकर्त्यांना समजतात घोडपेठ गावाजवळ येऊन कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातील देवतळे यांच्या प्रतिनिधीला चांगला प्रसाद दिल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे देवतळे आणि राजुरकर यांचे कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याचीही माहिती मिळाली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!