Counting of votes : ठरलं तर…चंद्रपूर विधानसभेच्या होणार 28 फेऱ्या

Counting of votes येत्या शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे.

Counting of votes या मतमोजणीकरीता जिल्हा प्रशासनासह संबंधित विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणा सज्ज असून याबाबत कर्मचा-यांचे प्रशिक्षणसुध्दा घेण्यात आले.

चंद्रपूर विधानसभेतील चर्चेतला आमदार

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. उद्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

याकरीता संबंधित विधानसभा मतदारसंघात तयारी झाली आहे. यात चंद्रपूर मध्ये मतमोजणीचे सर्वाधिक 28 फे-या तर बल्लारपूरमध्ये 27 फे-या होणार आहेत. Counting of votes

Chandrapur District Administration
चंद्रपूर यंत्रणा सज्ज

            विधानसभानिहाय टेबल आणि राऊंडची संख्या : 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीकरीता एकूण 14 ईव्हीएम टेबल, 25 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल राहणार आहे.  71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 28 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल, 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 27 फे-या आणि  7 पोस्टल बॅलेट टेबल, 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 23 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल, 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 23 फे-या आणि  6 पोस्टल बॅलेट टेबल, तर 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 25 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल राहणार आहेत.  Counting of votes

चंद्रपुरातील हा मार्ग राहणार बंद

            या ठिकाणी होणार मतमोजणी : राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, राजुरा येथे,  चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत मुल येथे, ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, नागभीड रोड, ब्रम्हपूरी येथे, चिमूर  विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, गोडावून क्रमांक 2 मोहबाळा रोड वरोरा येथे होणार आहे.

Employee training
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

कर्मचा-यांचे प्रशिक्षण : मतमोजणी संदर्भात तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे उजळणी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, सीमा गजभिये व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार सचिन खंडाळे यांनी सादरीकरणातून उपस्थितांना प्रशिक्षण दिले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!