devendra fadanvis in chandrapur भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर दौऱ्यावर असताना, त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी भेट देऊन आमदार जोरगेवार यांच्या मातोश्री स्व. गंगूबाई उर्फ ‘अम्मा’ यांना आदरांजली अर्पण केली.
चंद्रपूर विधानसभा निवडणूक निकाल वर्ष 2019
devendra fadanvis in chandrapur चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री ‘अम्मा का टिफिन’ उपक्रमाच्या प्रणेत्या, स्व. गंगूबाई, उर्फ यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, औद्योगिक, क्रीडा क्षेत्रातील नामवंतांनी शोकसंदेशांच्या माध्यमातून अम्माला आदरांजली अर्पण केली.
अम्मा हे सामाजिक कार्यात मोठे नाव होते. ‘अम्मा का टिफिन’, ‘अम्मा की दुकान’, आणि ‘अम्मा की जल सेवा’ या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे कार्य केले. मात्र दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून महायुती आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे असलेल्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी आज शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर दौऱ्यावर होते. devendra fadanvis in chandrapur
दादमहल येथील कोहिनूर तलावाजवळ त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मिलन चौकातील आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचून अम्मांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. यावेळी ना. फडणवीस यांनी अम्मा टिफिन उपक्रमची पहाणी करत कौतुक केले.
सामाजिक उपक्रमांतून निराधारांची सेवा करणाऱ्या अम्मांची सेवा राज्यासाठी प्रेरणादायी आहे. आज निराधारांची ‘अम्मा’ आपल्यात नसली तरी, त्यांनी सुरू केलेले प्रत्येक उपक्रम सेवाभावनेतून पुढे नेला जाईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.