Dolly Chaiwala बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील हॉटसीट असलेल्या लढतीमध्ये सोशल मीडिया स्टार डॉली चायवाला केटलीच्या प्रचारासाठी 17 नोव्हेंबर रोजी येणार आहे.
Dolly Chaiwala बल्लारपूर मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार विरुद्ध कांग्रेसचे संतोष रावत विरुद्ध अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांची तिरंगी लढत होणार आहे.
वरोरा विधानसभा क्षेत्रात भाजपचा वाद चव्हाट्यावर
नुकताच लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झालेले सुधीर मुनगंटीवार हे सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे, आधी कांग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार असे चित्र होते मात्र अपक्ष उमेदवार गावतुरे यांच्या एंट्रीने प्रस्थापित पक्षांना घाम फुटला आहे.
प्रचाराच्या तोफा अंतिम टप्प्यात असून कांग्रेस, भाजप पक्ष आपल्या स्टार प्रचारकांना मतदारसंघात प्रचार करायला लावत आहे, चळवळी मधून सामाजिक व आता राजकीय क्षेत्रात उदयास आलेले नाव म्हणजेच डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या प्रचार सभेला मिळत असलेला प्रतिसाद बघता चहा ची केटली ने वातावरण तापविले अशी चिन्हे आहे.
तापलेल्या राजकीय वातावरणात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना चहा चा घोट पाजण्यासाठी नागपुरातील जगप्रसिद्ध डॉली चायवाला केटलीचा प्रचार करण्यासाठी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी दाखल होणार आहे.
17 नोव्हेंबर रोजी भाजपचे स्टार प्रचारक आंध्रप्रदेश चे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सुद्धा बल्लारपूर शहरात येत आहे आणि याच दिवशी सायंकाळी डॉली चायवाला यांचं आगमन होणार असून दोघांपैकी कुणाची चांगली क्रेज आहे हे समजेल.