Downfall of BSP party 14 एप्रिल 1984 मध्ये कांशीराम यांनी बहुजन पक्षाची स्थापना केली, बसपाचे निवडणूक चिन्ह हत्ती आहे, राजकीय क्षेत्रातील निवडणुकीत बसपाने सहभाग घेतला.
Downfall of BSP party उत्तरप्रदेश राज्यात बसपाची सत्ता स्थापन झाली होती, देशाच्या राजकारणात बसपाने चांगलीच मुसंडी मारली मात्र कालांतराने आज बसपाचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागला आहे, कारण बसपा नेतृत्व राजकारणात फारसे रस नसल्याचे चित्र दाखवीत आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात बहुजन समाज पक्षाची पूर्वीची व आताची स्थिती काय? विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीत बसपाची भूमिका काय होती? यावर आपण चर्चा व उमेदवारांच्या मतांवर एक नजर टाकूया. Downfall of BSP party
अपक्ष उमेदवार यांनी लावला ईव्हीएम मशीन घोटाळ्याचा आरोप
वर्ष 1990 मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीत बसपाने आपला उमेदवार उभा केला होता, त्यावेळी कांग्रेसचे श्याम वानखेडे विजयी झाले होते, त्यांना एकूण 57 हजार 622 मते मिळाली होती.
दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष गयाचरण त्रिवेदी उर्फ धन्नू महाराज यांना 24 हजार 947 मते मिळाली, तिसऱ्या क्रमांकावर खोब्रागडे रिपब्लिकन पक्षाचे जयंतराव पडवेकर यांना 22 हजार 486 मते मिळाली.
बहुजन समाज पक्षाचे उमेदवार देवराव कोल्हे यांना केवळ 1 हजार 148 मते मिळाली, त्यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
वर्ष 1995 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे विजयी झाले होते त्यांना एकूण 94 हजार 379 मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर कांग्रेसचे श्याम वानखेडे यांना 29 हजार 915 मते, तिसऱ्या क्रमांकावर जनता दलाचे महेबूब राजाखान यांना 29 हजार 167 मते मिळाली होती. या निवडणुकीत सुद्धा बसपाने सहभाग घेतला, बसपाने राजकुमार तिरकुटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले, त्यांनी थेट चौथ्या क्रमांकावर मजल मारीत 6 हजार 832 मते मिळवली होती. Downfall of BSP party
वर्ष 1999 मध्ये चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत बसपाने सहभाग घेतला नाही, वर्ष 2004 च्या निवडणुकीत बसपाने सहभाग घेतला, त्यावेळी भाजपचे सुधीर मुनगंटीवार विजयी झाले त्यांना एकूण 94 हजार 3 मते मिळाली होती.
दुसऱ्या क्रमांकावर कांग्रेसचे गजानन गावंडे गुरुजी यांना 67 हजार 102 मते मिळाली, तर तिसऱ्या क्रमांकावर बसपाचे नंदकिशोर मंडलिक यांना 11 हजार 311 मते मिळाली. Downfall of BSP party
वर्ष 2009 मध्ये भाजपचे नाना श्यामकुळे निवडणुकीत विजयी झाले, 2009 मध्ये चंद्रपूर विधानसभा अनुसूचित जाती करीता राखीव होते. श्यामकुळे यांना एकूण 67 हजार 255 मते मिळाली होती, दुसऱ्या क्रमांकावर कांग्रेस पक्षाच्या बिता रामटेके यांना 51 हजार 845 मते मिळाली यावेळी तिसऱ्या क्रमांकावर बसपाने मजल मारली. बसपाच्या उमेदवार तनुजा खोब्रागडे यांना 14 हजार 35 मते मिळाली.
वर्ष 2014 मध्ये चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत भाजपचे नाना श्यामकुळे हे दुसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झाले त्यांना एकूण 81 हजार 483 मते मिळाली, दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे किशोर जोरगेवार यांना 50 हजार 711 मते तिसऱ्या क्रमांकावर कांग्रेसचे महेश मेंढे यांना 25 हजार 140 मते चौथ्या क्रमांकावर भारिप बहुजन महासंघाचे अनिरुद्ध वनकर यांना 14 हजार 683 मते मिळाली. Downfall of BSP party
बसपाचे उमेदवार थेट पाचव्या क्रमांकावर आले, अंकलेश नथुजी खैरे यांना 8 हजार 357 मते मिळाली. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर बसपातून लढलेले उमेदवार पक्ष बांधणी मध्ये दिसून येत नाही.
वर्ष 2019 च्या चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांचा विजय झाला त्यांना एकूण 1 लाख 17 हजार 570 मते मिळाली, दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे नाना श्यामकुळे यांना 44 हजार 909 मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे अनिरुद्ध वनकर यांना 15 हजार 403 मते तर चौथ्या क्रमांकावर कांग्रेसचे महेश मेंढे यांना 14 हजार 284 मते मिळाली होती. Downfall of BSP party
पाचव्या क्रमांकावर पीपीआयडी चे नामदेव गेडाम यांना एकूण 3 हजार 956 मते मिळाली तर बसपाने 6 व्या क्रमांकावर मजल मारीत भिखु बुद्धशरण यांना 1 हजार 772 मते मिळाली.
वर्ष 2024 च्या निवडणुकीत भाजपचे किशोर जोरगेवार हे दुसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झाले त्यांना एकूण 1 लाख 6 हजार 841 मते, दुसऱ्या क्रमांकावर कांग्रेसचे प्रवीण पडवेकर यांना 84 हजार 37 मते, तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष ब्रिजभूषण पाझारे यांना 14 हजार 598 मते, चौथ्या क्रमांकावर अपक्ष राजू झोडे यांना 5 हजार 711 मते तर पाचव्या क्रमांकावर बसपाचे मनोज लाडे यांना 1 हजार 891 मतांवर समाधान मानावे लागले. Downfall of BSP party
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या एकूण सात वेळा बसपाने उमेदवार उभा केला होता वर्ष 2009 मध्ये तनुजा खोब्रागडे यांना 14 हजारांच्या वर मते मिळाली होती, त्यानंतर बसपा पक्षाला चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात उतरती कळा लागली.
आता बसपाची चंद्रपूर जिल्ह्याची सूत्रे युवा नेते शिरीष गोगुलवार यांच्या हाती गेली, लोकसभा व आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली मात्र त्याना फारसे यश मिळाले नाही. वर्ष 2026 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे, यामध्ये बसपाला किती यश व अपयश येत ही आगामी वेळ सांगणार.