Election results live चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक निकालात भाजपने 6 पैकी 5 जागेवर विजय मिळविला तर कांग्रेसला 1 जागेवर समाधान मानावे लागले.
Election results live 20 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अनेक घडामोडी घडल्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रात 3 ठिकाणी तिहेरी तर उर्वरित 3 ठिकाणी दुहेरी लढत बघायला मिळाली.
राज्यात महायुतीने बहुमत पटापट केल्याने त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. Election results live
चंद्रपूर विधानसभा
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजप विरुद्ध कांग्रेस अशी लढत आहे. भाजपचे किशोर जोरगेवार यांना 1 लाख 6 हजार 841 तर कांग्रेसचे प्रवीण पडवेकर यांना 84 हजार 37 मते मिळाली. अपक्ष ब्रिजभूषण पाझारे 14 हजार 598, अपक्ष राजू झोडे यांना 5 हजार 711 मते मिळाली. किशोर जोरगेवार 22 हजार 804 मतांनी विजयी.
बल्लारपूर विधानसभा
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजप ची लढत कांग्रेस व अपक्ष सोबत आहे, भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना 1 लाख 5 हजार 969 मते तर कांग्रेसचे संतोषसिंह रावत यांना 79 हजार 984 मते व अपक्ष अभिलाषा गावतुरे यांना 20 हजार 935 मते मिळाली. सुधीर मुनगंटीवार 25 हजार 985 मतांनी विजयी.
राजुरा विधानसभा
राजुरा विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत – कांग्रेसचे सुभाष धोटे यांना 69 हजार 828 इतकी मते, शेतकरी संघटना वामनराव चटप यांना 55 हजार 90 भाजपचे देवराव भोंगळे यांना 72 हजार 882 मते मिळाली. देवराव भोंगळे 3 हजार 54 मतांनी विजयी.

चिमूर विधानसभा
चिमूर मतदारसंघात कांग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत आहे. भाजपचे बंटी भांगडीया यांना 1 लाख 16 हजार 495 मते तर कांग्रेसचे सतीश वारजूरकर यांना 1 लाख 6 हजार 642 मते मिळाली. बंटी भांगडीया 9 हजार 853 मतांनी विजयी.
वरोरा विधानसभा
वरोरा विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत. कांग्रेसचे प्रवीण काकडे यांना 25 हजार 49 मते, भाजपचे करन देवतळे यांना 65 हजार 170 मते तर अपक्ष मुकेश जीवतोडे यांना 49 हजार 720 मते, अपक्ष अहतेशाम अली यांना 20 हजार 723 मते. करन देवतळे 15 हजार 450 मतांनी विजयी.
ब्रह्मपुरी विधानसभा
ब्रह्मपुरी मतदारसंघात दुहेरी लढत, कांग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना 1 लाख 12 हजार 377 मते तर भाजपचे कृष्णा सहारे यांना 98 हजार 289 मते. विजय वडेट्टीवार यांना 14 हजार 88 मतांनी विजय.