electronic voting machine : संविधान बचाव चा नारा देत महिलेचा ईव्हीएम मशीनवर धावा

electronic voting machine चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिवसभरात काही ठिकाणी कांग्रेस-भाजप कार्यकर्ते यांचा वाद बघायला मिळाला.

electronic voting machine वरोरा विधानसभा क्षेत्रातील भद्रावती येथे एका महिलेने थेट ईव्हीएम मशीनच आदळली, या घटनेमुळे उपस्थित मतदान केंद्र अधिकारी यांची तारांबळ उडाली.

ग्रामीण भागातील जनता हुशार, शहरी भागातील जनता मतदानात निरुत्साही

सदर कृत्य करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले, विशेष म्हणजे संविधान बचाव, ईव्हीएम मशीन हटाव असा नारा त्या महिलेने यावेळी दिला.

वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीदरम्यान भद्रावती येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान टाकण्यासाठी गेलेल्या एका राजकीय पक्षाची महिलेने संविधान बचाव चा नारा देत थेट ईव्हीएम मशीनवर धावा बोलला. electronic voting machine


लता मंसराम शिंगाडे वय ६५ वर्षे राहणार सुरक्षा नगर भद्रावती असे त्या महिलेचे नाव आह . ही महिला बहुजन मुक्ती पार्टीची कार्यकर्ता आहे. ही महिला दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान मतदान करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या बूथ क्रमांक ३०९ गेली असता तिथे मतदान करते वेळी ईव्हीएम मशीन उचलून जोराने त्या टेबलावर आदळली आणि ईव्हीएम हटाव संविधान बचाव अशी नारेबाजी करत तिने बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशा घोषणा करत होती.

ही घटना होताच येथील मतदान केंद्रावरील अधिकारी तसेच सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले या घटनेने येथे अर्धा तास मतदान केंद्राची प्रक्रिया थांबली होती पोलिसांनी लता शिंगाडे या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे करीत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!