BJP rebels : ब्रिजभूषण पाझारे यांची भाजपातून हकालपट्टी

BJP rebels महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्या 40 जणांना नेत्यांना अखेर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने पक्षाकडून ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

बंगाली समाजाचा निर्धार पुन्हा किशोर जोरगेवार

Bjp rebels या हकालपट्टीमध्ये चंद्रपुरातील ब्रिजभूषण पाझारे, ब्रह्मपुरी वसंत वारजूरकर, वरोरा राजू गायकवाड, अहतेशाम अली यांच्यासह एकूण 40 जणांवर पक्षाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बंडखोरी करणाऱ्यांवर पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करणार असल्याचे सांगितले होते.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते, मात्र ऐनवेळी चंद्रपुरातील अपक्ष आमदार जोरगेवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने पाझारे यांचा पक्षातून अपेक्षाभंग झाला. Bjp rebels

चंद्रपुरातील रेल्वे स्टेशन जवळ बंदूक सह युवकाला अटक

उमेदवारी न मिळाल्याने पाझारे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केला, भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपविला होता, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांना भाजप पक्षाने अर्ज मागे घेण्यास सांगितले मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला.

20241106 080955

5 नोव्हेंबर रोजी पक्ष सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी भाजप पक्षातील 40 जणांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याचे पत्र जारी केले. मात्र पाझारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी अनेक भाजप पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते, त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!